मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) याने नुकत्याच संपुष्टात आलेल्या अॅशेस (Ashes) मालिकेत प्रभावी खेळी केली आणि ऑस्ट्रेलियाच्या (Australia) संघात आपले स्थान निर्माण केले. मार्नस आज ऑस्ट्रेलिया संघाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. अॅशेसदरम्यान लबूशेनला स्टीव्ह स्मिथ याच्या जागी कनकशन सबस्टीट्यूट्स म्हणून दुसर्या कसोटी सामन्यात संधी मिळाली. यानंतर, स्मिथ परतल्यावरदेखील लाबूशेन उर्वरित सामन्यांसाठी संघाचा भाग होता. त्याने प्रत्येक डावात आपली अर्धशतकी खेळी केली आणि संघात महत्वाचे योगदान दिले.अॅशेसनंतर आतालाबुशेनने काऊंटी क्रिकेटमध्ये देखील प्रभावी खेळी करत आहे. लाबूशेन सध्या ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या मार्श चषक (Marsh Cup) स्पर्धेत व्यस्त आहे आणि या स्पर्धेत त्याने पुन्हा एकदा आपल्या खेळाबद्दल कटीबद्ध असल्याचे दाखवून दिले. (Marsh Cup: 11 ओव्हरमध्ये 'या' संघाला करायच्या होत्या 5 धावा, रोमांचक मॅचमध्ये 1 धावांनी झाला पराभव, पहा Video)
रविवारी व्हिक्टोरिया (Victoria) संघाविरूद्ध क्वीन्सलँडकडून (Queensland) खेळत असताना त्यांच्यासोबत एक घटना घडली. क्वीन्सलँडने 323 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना व्हिक्टोरिया संघाची स्थिती खराब झाली होती. विल सदरलँड, क्रिस ट्रेमेनसह संघर्ष करत होता. सदरलँडने एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, लाबूशेनने त्याच्या डाव्या बाजूला मोठी डाईव्हच्या सहाय्याने चेंडू रोखला आणि चेंडू विकेटकीपरच्या दिशेने फेकला. जिथे विकेटकिपरने त्याला धाव बाद केले. या सर्व प्रकारात, चेंडू थांबविण्यासाठी लाबूशेनने डाईव्ह मारल्यावर त्याची पँट खाली आली. पण, असे असूनही, तो अस्वस्थ झाला नाही आणि वेळ न गमावता त्याने चेंडू विकेटकीपरकडे फेकला. ज्याणेंकरून फलंदाजाला बाद करणे शक्य झाले.
क्वीन्सलँडच्या गोलंदाजांनी संपूर्ण व्हिक्टोरिया संघाला 168 धावांवर बाद केले आणि 154 धावांच्या मोठ्या फरकाने त्यांचा पराभव केला. लाबूशेनबद्दल बोलले तर, त्याने ऑस्ट्रेलियासाठी अॅशेसमध्ये 353 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला अॅशेस जिंकायला यश आले नसले तर त्यांनी ट्रॉफी कायम राखली.अॅशेससाठी राष्ट्रीय संघात प्रवेश घेण्यापूर्वी 25 वर्षीय लाबुशेनने ग्लॅमरगॉनसाठी 65 च्या सरासरीने एक हजार 114 धावा केल्या.