डिस्कवरी चॅनलवरील बेयर ग्रिल्सचा (Bear Grylls) प्रसिद्ध 'मॅन व्हर्सेस वाइल्ड' (Man vs Wild) हा शो भारतात खूप लोकप्रिय आहे. काही महिन्यांपूर्वी या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी झळकले होते. बेयर ग्रिल्स भारतात येऊन त्याने पंतप्रधानांसोबत याचे चित्रीकरण केले होते. त्या भागाला भारतासह जगातील अनेक देशांत पसंती मिळाली होती. त्यानंतर अलीकडेच रजनीकांत आणि अक्षय कुमारने (Akshay Kumar) यांनीही या शोसाठी शूट केले आहे.
आता दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांची नावेही या यादीत समाविष्ट झाली आहेत. इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार ही 14 भागांची मालिका असेल, ज्यामध्ये इतर कलाकारही भाग घेणार आहेत.
दीपिका आणि विराट व्यतिरिक्त यामध्ये आणखी सेलेब्रिटी शूट करणार आहेत. पहिल्यांदाच दीपिका आणि विराट एकत्र येणार असल्याने, हा दोघांच्याही चाहत्यांसाठी दुग्धशर्करा योग असेल. या दोघांना एकत्र पाहणे अतिशय रंजक असणार आहे. अद्याप या दोघांचे शूटिंग होणे बाकी आहे. या शोसाठी नुकतेच रजनीकांत यांनी कर्नाटकच्या बांदीपुरा जंगलात, सुमारे 6 तास शूटिंग केले होते. त्या वेळी अशी अफवा पसरली होती की, शूटिंग दरम्यान रजनीकांतला दुखापत झाली, पण तसे झाले नाही. रजनीकांत यांचा भाग दोन भागांमध्ये प्रसिद्ध होईल (हेही वाचा: Man Vs Wild मध्ये नरेंद्र मोदी आणि बराक ओबामा यांच्यात होतं 'हे' साधर्म्य, Bear Grylls ने शेअर केला अनुभव (Watch Video))
त्यानंतर गुरुवारी अक्षय कुमारनेही या शोसाठी जवळपास 3 तास शूट केले. दरम्यान, टाईम्स ऑफिस इंडियाच्या वृत्तानुसार, रजनीकांत यांनी बेयर ग्रिल्ससमवेत बांदीपूर टायगर रिझर्व्ह पार्कमध्ये शोचे चित्रीकरण केले. मात्र काही कार्याक्रत्यांनी याबाबत नोषेध नोंदवला आहे. अभयारण्यामधील प्राण्यांची काळजी व्यक्त करत रजनीकांत यांच्या अटकेची मागणी केली जात आहे.