2.0 Movie: रजनीकांत आणि अक्षयकुमार यांच्या चित्रपटातील 20 कोटींचे गाण प्रदर्शित
2.0 चित्रपट ( फोटो सौजन्य- ट्विटर)
2.0 Movie: खिलाडी अक्षय कुमार आणि सुपरस्टार रजनीकांत यांचा आगामी चित्रपट 2.0 मधील गाण प्रदर्शित करण्यात आले आहे. तसेच या गाण्यासाठी तब्बल 20 कोटी रुपये खर्च केला आहे.
येत्या 29 नोव्हेंबर रोजी या वर्षीचा सर्वात प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचविणारा चित्रपट 2.0 प्रर्शित होणार आहे. तर या चित्रपटातील एक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. मात्र गाण्याच्या बजेटवरुन असे लक्षात येईल की मराठी किंवा कोणत्या भाषेत तीन-चार चित्रपट सहजपणे बनविता येतील. 'तु ही रे' असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यामध्ये रजनीकांत आणि अॅमी जॅक्सन रोबोटिक डान्स करताना दिसणार आहेत. मात्र तेलगु आणि तमिळ भाषेत हे गाणे आधीच प्रदर्शित करण्यात आले होते.

 2.0 चे 'तु ही रे' हे गाणे अरमान मलिक आणि शाषा तिरुपती यांनी गायले आहे. तर या गाण्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून ते आता चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत.