Lokesh Rahul Birthday: टीव्हीवरील कॉफी विथ करण (Koffe with Karan)मधून झळकलेले क्रिकेटपटू लोकेश राहुल (K.L. Rahul) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांनी शोमध्ये केलेल्या वादग्रस्त विधानामुळे त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. त्यानंतर नेटकऱ्यांनी या दोघांना चांगलेच सुनावले असून खेळण्याची बंदी सुद्धा घालण्यात यावी असे म्हटले होते. मात्र सध्या आयपीएल मधून राहुल आणि पांड्या आपल्या दमदार खेळीने प्रेक्षकांची मने जिंकताना दिसून येत आहे. तर भारत विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाबच्या सामन्यात केएल राहुल ह्याने आपले शतकपूर्ती केली. त्यावेळी हार्दिक पांड्या ह्याने त्याची गळाभेट घेत त्याला शुभेच्छा देताना दिसून आला.
तर आता राहुल आणि पांड्या यांना वर्ल्डकपसाठी टीम इंडियात स्थान देण्यात आले आहे. तर आज लोकेश राहुल ह्याचा 27 वा वाढदिवस आहे. राहुल ह्याच्या मित्रपरिवारने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी उपस्थिती लावून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु भाऊ म्हणून मानणाऱ्या हार्दिक पांड्याने तर हटके अंदाजात त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असे म्हटले आहे की, 'ब्रदर्स फॉर लाईफ' अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.(हेही वाचा-MI Vs KXIP, IPL 2019: केएल राहुल ह्याचे आयपीएलमधील शकत पूर्ण, हार्दिक पांड्याने गळाभेट घेत दिल्या शुभेच्छा)
View this post on Instagram
View this post on Instagram
हार्दित पांड्यासह राहुल ह्याच्या वाढदिवसाला रिषभ पंत, अक्षर पटेल आणि कृणाल पांड्या यांनी उपस्थिती लावल्याचे फोटो सोशल मीडियावर झळकले आहेत. तर आता भारतीय क्रिकेट टीमचा ऑलराऊंडर हार्दिक पंड्या आणि बॅट्समन लोकेश राहुल आगामी वर्ल्डकपमध्ये चांगलं प्रदर्शन दाखवण्यासाठी तयार आहे.