Koffee With Karan मधील वादग्रस्त विधानानंतर Hardik Pandya ने ट्विटरवरुन मागितली माफी
Hardik Pandya and KL Rahul with Karan Johar (Photo Credits: Twitter)

बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या (Karan Johar) लोकप्रिय टॉक शो 'कॉफी विथ करण 6' (Koffee With Karan 6) मध्ये काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू केएल राहुल (KL Rahul) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांनी वर्णी लावली होती. शो मध्ये महिलांवरुन केलेल्या विधानामुळे हार्दिकवर प्रचंड टीका झाली. त्याचबरोबर सचिनपेक्षा विराट उत्तम फलंदाज असल्याचे हार्दिक पांड्याने म्हटले. त्यानंतर मात्र नाराज झालेल्या सचिनच्या चाहत्यांनी हार्दिकला सोशल मीडियात चांगलेच ट्रोल केले.

प्रचंड झालेल्या टीकेनंतर हार्दिकला चूक उमगली आणि त्याने ती मान्य करत ट्विटरवरुन माफी मागितली. "कोणाच्याही भावना दुखवण्याचा उद्देश नव्हता. कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील किंवा त्यांचा अनादर झाला असल्यास मी माफी मागतो," असे हार्दिकने ट्विटमध्ये म्हटले आहे.

हार्दिक आणि केएल राहुलने अनेक खाजगी गोष्टींचा उलघडा करत शो ला रंगत आणली. हार्दिकला करिना कपूरला डेट करायचे आहे तर केएल राहुलचे मलायका अरोरावर क्रश आहे.

हार्दिक पांड्या सध्या इंडियन टीमसोबत ऑस्ट्रेलियात आहे. मेलबर्न आणि सिडनी टेस्टमध्ये खेळू न शकलेला हा ऑलराऊंडर क्रिकेटर सध्या 12 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या 'वन डे इंटरनॅशनल सिरीज' (ODI series) च्या तयारीत  व्यस्त आहे.