MI Vs KXIP, IPL 2019: केएल राहुल ह्याचे आयपीएलमधील शकत पूर्ण, हार्दिक पांड्याने गळाभेट घेत दिल्या शुभेच्छा
KL Rahul and Hardik Pandya (Photo Credits-Twitter)

MI Vs KXIP, IPL 2019: केएल राहुल (KL Rahul) ह्याने बुधवारी वानखेडे (Wandkhede) येथे रंगलेल्या मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) विरुद्धच्या सामन्यात आपले आयपीएल (IPL) मधील शतक पूर्ण केले आहे. त्यावेळी राहुलने 64 चेंडूत 100 धावा काढत आपले शतक पूर्ण केले आहे.

राहुलने किंग्स इलेव्हन पंजाबच्या शेवटच्या ओव्हरमध्ये धमाकेदार खेळी करत आपले शतक पूर्ण केले. त्यावेळी मुंबई इंडियन्स संघातील त्याचा खास मित्र हार्दिक पांड्या ह्याने त्याची गळाभेट घेत शकत पूर्ण केल्याच्या शुभेच्छा देताना दिसून आला. याबद्दलचे आयपीलने ट्वीट करत असे म्हटले आहे की, आयपीएल मधील शतक पूर्ण करणारा राहुल चौथ्या स्थानकावर पोहचला आहे. यापूर्वी संजू सॅमसन, जॉनी बेयरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर यांनी त्यांचे आयपीएलमधील शतक पूर्ण केले आहे.(हेही वाचा-KWK 6 Controversy: लोकपालांसमोर हार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांनी मांडली आपली बाजू ; वर्ल्ड कपमधील स्थानाबाबत लवकरच होईल निर्णय)

दरम्यान कॉफी विथ करण शोमध्ये वाईट पद्धतीची टिप्पणी केल्यामुळे हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांच्यावर टीका करण्यात आली होती. तर सध्या बीसीसीआयच्या लोकपालांकडे अद्याप या दोघांबद्दल चौकशी सुरु आहे.