भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) संघातील टी-20 मालिकेनंतर आता दोन्ही संघात 2 सामन्यांची टेस्ट मालिका खेळली जाईल. यातील पहिला टेस्ट सामना 14 नोव्हेंबरला होळकर स्टेडियम, इंदोरमध्ये खेळला जाईल. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) चा भाग असलेल्या या मालिकेतील दुसरा सामना डे/नाईट असेल. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स (Eden Gardens) मैदानावर खेळला जाईल. टीम इंडियाने आजवर टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये खेळलेल्या 5 टेस्ट सामन्यांमधील सर्व सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत टीम इंडियाने अव्वल स्थान मिळवले अशी. सध्या कोणताही संघ भारताच्या जवळही नाही आहे. त्यामुळे बांग्लादेशविरुद्ध कसोटी मालिका जिंकून टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये विजयाची हॅटट्रिक करत विजयी रथ कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. भारत-बांग्लादेशमध्ये होणाऱ्या या टेस्ट मालिकेचे नाव 'गांगुली-दुर्जोय ट्रॉफी' (Ganguly-Durjoy Trophy) आहे. (IND vs BAN 2019 Test: 1 विकेट घेत रविचंद्रन अश्विन याचा अनिल कुंबळे सह 'या' Elite यादीत होईल समावेश, हरभजन सिंह यालाही पिछाडीवर टाकण्याची संधी)
भारत-बांग्लादेश पहिल्या टेस्ट मॅचचं लाइव्ह प्रक्षेपण प्रेक्षकांना स्टार स्पोर्ट्स (Star Sports) 1 आणि स्टार स्पोर्ट्स 1 एचडी इंग्रजी कॉमेंट्रीमध्ये आणि स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडी हिंदी भाषामध्ये पाहता येईल. शिवाय, लाइव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग हॉटस्टार (Hotstar) वर उपलब्ध असेल. शिवाय तुम्ही या सामन्याचे थेट प्रक्षेपण आमच्या यूट्यूब चॅनेलवर पाहू शकता.
मयंक अग्रवाल (Mayank Agrawal) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा एकदा टीम इंडियासाठी कसोटी मालिकेत डावाची सुरुवात करतील. यंदाच्या मालिकेत दोंघांना पुन्हा एकदा बऱ्याच धावा करण्याची संधी आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध नुकत्याच संपलेल्या मालिकेत दोघांनी सलामी फलंदाज म्हणून एकूण 829 धावा केल्या आहेत. दोन्ही सलामी फलंदाज बांग्लादेशविरूद्ध 2 सामन्यांच्या टेस्ट मालिकेत पुन्हा एकदा आपल्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी इच्छूक असतील. दरम्यान, टी-20 मालिकेसाठी विश्रांती मिळालेला कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा पुन्हा एकदा परतला आहे. विशेष म्हणजे बांग्लादेशविरुद्ध अखेरच्या दोन कसोटी सामन्यात कोहलीने दोन दुहेरी शतके ठोकण्याचे आश्चर्यकारक काम केले आहे. दुसरीकडे, नवीन कर्णधार मोमीनुल हक (Mominul Haque) याच्या नेतृत्वात बांग्लादेशी संघ कसा खेळ करतो हे पाहणे उत्साहाचे असेल. महमूदुल्लाच्या नेतृत्वात संघाने टी-20 मध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे टीम इंडियाचा ताण मात्र नक्कीच वाढला असेल.
असा आहे भारत आणि बांग्लादेशचा टेस्ट संघ:
टीम इंडिया: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिद्धिमान साहा, हनुमा विहारी, शुभमन गिल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, रिषभ पंत, कुलदीप यादव आणि उमेश यादव.
टीम बांग्लादेश: मोमीनुल हक (कॅप्टन), अल-अमीन-हुसेन, इम्रुल कायस, शादमन इस्लाम, सैफ हसन, महमूदुल्ला, मोसद्देक हुसेन, मेहेदी हसन, लिटन दास, मुश्फिकुर रहीम, मोहम्मद मिथुन, तैजुल इस्लाम, नईम हसन, मुस्तफिजुर रहमान आणि इबादत हुसेन.