न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टनमधील दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टेस्ट सामन्यात भारताला न्यूझीलंडने पहिल्या डावात घेतलेल्या 183 धावांच्या आघाडीच्या प्रत्युत्तरात 191 धावत करता आल्या. भारताने न्यूझीलंडसमोर जिंकण्यासाठी केवळ 9 धावांचे लक्ष्य दिले जे यजमान टीमने एकही विकेट न गमावता 1.4 ओव्हरमध्ये गाठले. या विजयासह न्यूझीलंडने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. टीम इंडिया पहिल्या डावात 165 धावांवर ऑलआऊट झाली.

भारत आणि न्यूझीलंडमधील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना वेलिंग्टनमध्ये खेळला जात आहे. सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या दुपारच्या जेवणाआधी न्यूझीलंडने भारताला 191 धावांवर ऑलआऊट केले. आणि आता त्यांना जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने 4, टिम साऊथीने 5 आणि कॉलिन डी ग्रैंडहोम ने 1 गडी बाद केला. अन्य कोणत्याही किवी गोलंदाजाला विकेट मिळाली नाही. 

इशांत शर्माच्या मागोमाग रिषभ पंतनेही आपली विकेट गमावली.टिम साउथीने पंतला 25 धावांवर ट्रेंट बोल्टकडे कॅच आऊट केले. दुसऱ्या डावात भारताने 8 धावांची आघाडी घेतली आहे. 

कॉलिन डी ग्रैंडहोमने 12 धावांवर इशांत शर्माला एलबीडब्ल्यू आऊट केले आणि भारताला आठवा धक्का दिला. भारताने सध्या दुसऱ्या डावात 189 धावा करत 6 धावांची आघाडी घेतली आहे. 

भारत-न्यूझीलंडमधील सामन्यात भारतासमोर डावाने पराभवाचे संकट उभे आहे. टीम साऊथीने अश्विनला एलबीडब्ल्यू आऊट केले आणि भारताला सातवा धक्का दिला. 

चौथ्या दिवशी भारताला दुसऱ्या डावात न्यूझीलंडने सलग दुसऱ्या ओव्हरमध्ये धक्का दिला. टीम साऊथीने हनुमा विहारीला 15 धावांवर बोल्ड केले भारताला सहावा झटका दिला. 

भारत-न्यूझीलंडमध्ये चौथ्या दिवसाची सुरुवात झाली आहे आणि ट्रेंट बोल्टने आपल्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये भारताला पाचवा धक्का दिला. बोल्टने ओव्हरच्या दुसऱ्याच चेंडूवर भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला माघारी धाडले. रहाणेने 29 धावा करून बीजे वॅटलिंगकडे कॅच आऊट झाला. 

भारत-न्यूझीलंडमधील चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. ट्रेंट बोल्ट पहिली ओव्हर टाकायला आलाय, तर भारताकडून अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी सध्या फलंदाजी करत आहेत. 

भारत (India) आणि यजमान न्यूझीलंड (New Zealand) टीम आज चौथ्या दिवशी वेलिंग्टनमध्ये (Wellington) आमने-सामने येतील. रविवारी न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताने दुसर्‍या डावात 4 बाद 144 धावा केल्या. भारताची आघाडीची फळी पुन्हा एकदा अपयशी ठरली. मयंक अग्रवालला वगळता पृथ्वी शॉ, कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, सर्व स्वस्तात बाद झाले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) नाबाद 25 आणि हनुमा विहारी (Hanuma Vihari) नाबाद 15 धावा करून खेळत होते. आता यापूर्वी भारताने पहिल्या डावात 165 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडच्या संघाने तिसर्‍याच दिवशी 348 धावांची मोठी धावसंख्या रचली आणि सामन्यावर आपली पकड मजबूत केली. भारत दुसऱ्या डावात न्यूझीलंडच्या 39 धावांनी पिछाडीवर आहे आणि सामन्यात विजय मिळवायच्या आशा कायम ठेवण्यासाठी त्यांना रहाणे-विहारीच्या जोडीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.

दुसऱ्या डावात मयंक अग्रवालने भारताकडून सर्वाधिक 58 धावा केल्या. तर, न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्ट ने 3 गडी बाद केले. बोल्टने पृथ्वीला 14, चेतेश्वर 11 आणि कोहलीला 19 धावांवर बाद केले. दुसरीकडे, न्यूझीलंडविरुद्ध भारताकडून इशांत शर्माने 5 गडी बाद केले. तर रविचंदन अश्विन 3, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 1-1 गडी बाद केला होता. किवी संघाचा कर्णधार केन विल्यमसनने सर्वाधिक 89, रॉस टेलरने 44, काईल जेमीसन 44 आणि कॉलिन डी ग्रैंडहोमने 43 धावा केल्या. (सामन्याचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)