Lionel Messi Spotted Playing Dhol in Manchester: मॅनचेस्टर येथे पाकिस्तानी क्रिकेट जर्सीत लिओनेल मेस्सी याला ढोल वाजवताना पाहून नेटकरी चकित, पाहा Photo
पाकिस्तानी जर्सीत लिओनेल मेस्सी ढोल वाजवताना आढळला (Photo Credit: Twitter/Instagram)

अर्जेन्टिनाचा दिग्गज फुटबॉलर लिओनेल मेस्सीने (Lionel Messi) बार्सिलोना (Barcelona) क्लब सोडण्याची इच्छा व्यक्त केली असून मॅन्चेस्टर सिटी त्याला विकत घेण्याचा प्रबळ दावेदार असल्याचे मानले जात आहे. पण इंग्लंड (England) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील तिसर्‍या आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यादरम्यान, मॅंचेस्टरच्या (Manchester) ओल्ड ट्रॅफर्ड मैदानाबाहेर (Old Trafford) मेस्सी ढोल वाजवताना आढळला. मेस्सी सारख्या दिसणाऱ्याचा फोटो क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. अर्जेटिनाचा फॉरवर्ड मेस्सी सारखा दिसणारा हा व्यक्तीने पाकिस्तानी जर्सी घातलेली दिसत आहे. बार्सिलोना सोडल्यावर मेस्सीच्या पुढच्या क्लबमध्ये ट्रेडिंग सुरु आहे कारण 6 वेळा बॅलोन डी ओअर विजेत्याने बार्सिलोना क्लबमधून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. मेस्सीने बार्सिलोनाचे प्रतिनिधित्व जवळजवळ दोन दशके केले. मॅन्चेस्टर सिटी आणि युनायटेडने मेस्सीला खरेदी करण्यात रस दाखवला आहे, तर युरोपमधील काही अव्वल क्लबदेखील मेस्सीला सामील करण्याच्या शर्यतीत आहेत. (Lionel Messi in IPL? लिओनेल मेस्सी बार्सिलोना क्लब सोडण्याची चर्चा; आयपीएल फ्रँचायझी KKR ने 'पर्पल व गोल्ड' आर्मीशी जुडण्याची दिली ऑफर)

एकीकडे 33 वर्षीय मेस्सीच्या भविष्यावर अद्याप काहीच निर्णय झालेला नाही; पाकिस्तानी जर्सीमध्ये मेस्सीसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला ढोल वाजवताना पाहून सोशल मीडिया उजेर्सही चकित झाले. जवळून पाहिल्यास ती व्यक्ती लिओनेल मेस्सी नसल्याचेस्पष्ट होते. मेस्सीने मॅनचेस्टर गाठल्याबद्दल सोशल मीडियावर सध्या एक विनोद सुरू आहे. चाहत्यांच्या प्रतिक्रिया पहा:

लिओ मेस्सीने आधीच मॅनचेस्टर गाठले 

मेस्सी अगदी ढोल घेऊन पाकिस्तानला पाठिंबा देत होता

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधामुळे चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश नसल्याने अशी अनेक उदाहरणे आढळली आहेत जेव्हा चाहत्यांनी त्यांच्या संघाचा जयघोष करण्यासाठी आणि त्यांच्या कर्तृत्वाचा आनंद साजरा करण्यासाठीस्टेडियमच्या बाहेर गर्दी केली. शिवाय, या पाकिस्तानी चाहत्यांची प्रार्थना पाकिस्तानच्या कामी आली. पाकिस्तानने अंतिम आणि निर्णायक टी-20 सामन्यात इंग्लंडचा 5 धावांनी पराभव करत दौऱ्याचा शेवट गोड केला. पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिल्यानंतर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला होता. पण, अखेरच्या सामन्यात पाकिस्तानने जबरस्त कामगिरी केली आणि टी-20 मालिका 1-1 ने ड्रॉ केली.