आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC Test Ranking) नुकतीच कसोटी फलंदाजाची क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत कर्णधारपदाची भूमिका बजावणाऱ्या अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) बढती मिळाली आहे. तर, भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि वेगवान गोलंदाज जसप्रीस बुमराह (Jasprit Bumrah) यांना आपले स्थान कायम राखण्यात यश आले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिला कसोटी सामना खेळून विराट कोहली भारतात परतला होता. याचाच फटका विराट कोहलीला बसल्याचे चिन्ह दिसत आहेत.
आयसीसी कसोटी क्रमवारीत न्युझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन 919 गुणांसह अव्वल स्थानी आहे. पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिकेतील द्विशतकाने केनला प्रथमच आयसीसी क्रमावारीत अव्वल स्थानावर पोहचवले. या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ 891 गुणांसह दुसऱ्या आणि मार्नस लाबुशेन हा 878 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर, विराट कोहली 862 गुणांसह चौथ्या स्थानावर कायम आहे. या क्रमवारीत अजिंक रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना बढती मिळाली आहे. चेतेश्वर पुजारा 760 गुणांसह सातव्या स्थानावरून सहाव्या स्थानी पोहचला आहे. तर, अजिंक्य रहाणेने 748 गुणांसह नवव्या स्थानवरून आठवे स्थान पटकावले आहे. हे देखील वाचा- Virat Kohli Gifts To David Warner’s Daughter: भारताचा कर्णधार विराट कोहलीकडून डेव्हिड वॉर्नरच्या मुलीला खास भेट; पाहा फोटो
ट्विट-
Significant changes in the latest @MRFWorldwide ICC Test Player Rankings for batting 🏏
Full list: https://t.co/gDnVaiQl0W pic.twitter.com/PPRDZKvuMp
— ICC (@ICC) January 30, 2021
याआधी आयसीसीने एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली होती. या क्रमवारीत भारताचा तडाखेबाज फलंदाज रोहित शर्माने अव्वल आणि विराट कोहलीने दुसरे स्थान राखले आहे.