Lasith Malinga (Photo Credits-Twitter)

श्रीलंका (Sri Lanka) मधील वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा (Lasith Malinga) ह्याने 24 तासात दोन सामने खेळण्याचा विक्रम केला आहे. तसेच टी 20 आणि वनडे सामन्यात त्याने एकूण 10 विकेट्स घेतल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

बुधवारी संध्याकाळी मुंबई इंडियन्सच्या संघाकडून आयपीएलमध्ये खेळणाऱ्या मलिंगाने चेन्नई सुपर किंग्सचा परावभव केला. त्यावेळी त्याने 34 धावा देत 3 विकेट्स घेतला. त्यांनंतर हा सामना खेळून झाल्यानंतर मलिंगा मायदेशी परतला. तेथे आयोजित करण्यात आलेल्या सुपर फोर या एकदिवशीय सामन्यामध्ये तो टीम गॉलकडून खेळत आहे. टीम गॉलकडून खेळत असलेल्या मलिंगाने 49 धावा देत 7 विकेट्स घेतल्या असल्याने त्याच्याबद्दल सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.(हेही वाचा-MI vs CSK, IPL 2019: चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या महत्वाच्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, संघातील वेगवान गोलंदाजपटू लसिथ मलिंगा मायदेशी परतला)

तर सनसाईज हैदराबाद यांच्यासोबत खेळवण्यात आलेल्या 11 एप्रिल रोजीचा सामन्यात खेळू शकला नाही. तसेच श्रीलंका आणि भारतात सामने खेळवण्यात येत असल्याने त्याची धावपळ होताना दिसून येत आहे.