डेविड वॉर्नर आणि केएल राहुल (Photo Credit: PTI)

KXIP vs SRH, IPL 2020: इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) 43व्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात लढत थोड्याच वेळात सुरु होईल. अबू धाबी (Abu Dhabi) येथील शेख झायेद स्टेडियमवरील सामन्यात एसआरएचचा (SRH) कर्णधार डेविड वॉर्नरने (David Warner) टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघासाठी प्ले ऑफ शर्यतीत कायम राहण्यासाठी आजच्या सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे. अशा स्थितीत हैदराबादच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल झाला आहे तर किंग्स इलेव्हनकडून दोन बदल पाहायला मिळत आहे. हैदराबादने मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध शानदार विजय मिळवला तर पंजाबने त्यांच्या मागील तीन सामन्यात शानदार विजय मिळावा आणि आयपीएल प्ले ऑफच्या लढतीती आणखीन रंगात आणली. (KXIP vs SRH, IPL 2020 Live Streaming: किंग्ज इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)

हैदराबादने आजच्या सामन्यासाठी शाहबाज नदीमला बाहेर केले असून त्याच्या जागी खालील अहमदचा समावेश केला आहे. दुसरीकडे, पंजाबच्ये प्लेइंग इलेव्हनमधून मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) गायब आहे. मागील सामन्यात मयंकला दुखापत झाल्याने आजच्या सामन्याला त्याला मुकावे लागत आहे. त्याच्या जागी केएक्सायपीने मनदीप सिंहला संधी दिली आहे. याशिवाय पंजाब प्लेइंग इलेव्हनमधून जेम्स नीशमही बाहेर पडला असून त्याच्या जागी क्रिस जॉर्डनचा समावेश करण्यात आला आहे. किंग्ज इलेव्हन आणि सनरायझर्सची स्थिती एकसारखीच आहे. या दोन्ही संघांचे 10 सामन्यांपैकी आठ गुण आहेत पण हैदराबादचा संघ आठ संघांच्या गुणतालिकेत प्रतिस्पर्ध्यांपेक्षा चांगल्या नेट रनरेटच्या जोरावर एक स्थान पुढे, पाचव्या क्रमांकावर आहे. प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी या दोन संघांना उर्वरित सामने जिंकले गरजेचे आहे.

पाहा सनरायझर्स हैदराबाद आणि किंग्स इलेव्हन पंजाब इलेव्हन

सनरायझर्स हैदराबाद: डेविड वार्नर (कॅप्टन), जॉनी बेयरस्टो, मनीष पांडे, प्रियम गर्ग, अब्दुल समद, विजय शंकर, राशिद खान, जेसन होल्डर, संदीप शर्मा, खालील अहमद आणि टी नटराजन.

किंग्स इलेव्हन पंजाब: केएल राहुल (कॅप्टन), मनदीप सिंह, क्रिस गेल, निकोलस पूरन, ग्लेन मॅक्सवेल, क्रिस जॉर्डन, दिपक हुडा, रवी बिश्नोई, मुरुगन अश्विन, अर्शदीप सिंह आणि मोहम्मद शमी.