किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स (Photo Credit: PTI)

KXIP vs RR, IPL 2020: इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) 2020च्या 50व्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात अबू धाबीच्या शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर रंगतदार सामना रंगणार आहे. आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने (Steve Smith) टॉस जिंकला  आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. किंग्स इलेव्हन आजच्या सामन्यात आपली विजयी मोहीम कायम ठेवून प्ले ऑफच्या दिशेने एक पाऊल उचलण्याच्या प्रयत्नात असतील तर राजस्थान प्ले ऑफ शर्यतीत आपले आव्हान ठेवू पाहत असतील. दोन्ही संघांसाठी आजच्या सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे. अशा स्थितीत किंग्स इलेव्हनने प्लेइंग इलेव्हनमध्ये एकही बदल केलेला नाही तर रॉयल्सने एक बदल केला आहे. सलग पाच सामन्यात विजय मिळवत पंजाबने आपली गाडी विजयपथावर आणली, तर रॉयल्सने मागील सामन्यात मुंबई इंडियन्सचा 8 विकेटने दणदणीत पराभव करत प्ले ऑफ स्थानासाठी दावा ठोकला. (KXIP vs RR, IPL 2020 Live Streaming: किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)

राजस्थानने प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. रॉयल्सने अंकित राजपूतच्या जागी वरुण आरोनचा संघात समावेश केला आहे. राजस्थानसाठी सलामीला बढती मिळालेला बेन स्टोक्स लयीत परतला आहे. संजू सॅमसननेही गमावलेली लय पुन्हा मिळवली आहे, तर कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या खराब फॉर्ममुळे रॉयल्ससाठी डोकेदुखी सिद्ध होत आहे. मधल्या फळीत राहुल तेवतिया आणि रियान पराग जबाबदारी सांभाळत आहे, तर जोफ्रा आर्चर अंतर्गत राजस्थानची गोलंदाजांनी सरासरी कामगिरी बजावली आहे. दुसरीकडे, 'करा व मारा'च्या सामन्यात पंजाब संघाला कर्णधार आणि स्पर्धेत आजवर सर्वाधिक धावा करणाऱ्या केएल राहुलकडून मोठी अपेक्षा असेल. मनदीप सिंहच्या रूपात पंजाबला संघाला अतिरिक्त पर्याय मिळाला आहे. क्रिस गेल संघात सामील झाल्यानंतर संघाचा आत्मविश्वास अनेक पटींनी वाढला आहे. गोलंदाजीत मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह आणि रवी बिश्नोई प्रभावी कामगिरी बजावत आहे.

पाहा किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्सचे प्लेइंग इलेव्हन

किंग्स इलेव्हन पंजाब: केएल राहुल (कॅप्टन), मनदीप सिंह, क्रिस गेल, निकोलस पूरन, ग्लेन मॅक्सवेल, दीपक हुडा, क्रिस जॉर्डन, मुरुगन अश्विन, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह आणि रवी बिश्नोई.

राजस्थान रॉयल्स: स्टिव्ह स्मिथ (कॅप्टन), बेन स्टोक्स, रॉबिन उथप्पा, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर), राहुल तेवतिया, रियान पराग, जोफ्रा आर्चर, कार्तिक त्यागी, श्रेयस गोपाल आणि वरुण आरोन.