KXIP vs RCB, IPL 2020 Live Streaming: किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Disney+ Hotstar वर
किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Photo Credit: File Image)

इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) आपल्या पहिल्या विजेतेपदाच्या शोधात असलेले रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) यांच्यात आज आमने-सामने येतील. बेंगलोरने आपल्या पहिल्या आयपीएल (IPL) सामन्यात विजय मिळवला, तर पंजाबला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सुपर-ओव्हर सामन्यात लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. पंजाब आणि बेंगलोरचा आयपीएलच्या 13व्या हंगामातील सहावा सामना असेल. आजवर झालेले सर्व सामने मनोरंजक ठरले आणि हा सामना देखील तितकाच रंगतदार ठरेल हे नक्की. आयपीएलच्या आजच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Dubai International Stadium) आमने-सामने येतील. सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल. भारतात प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. आपण या सामन्याचे थेट प्रवाह Disney+ Hotstar अ‍ॅपवर पाहू शकता. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात. (Fit India Dialogue 2020: 'यो यो टेस्ट म्हणजे काय?' पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रश्न ऐकून विराट कोहलीला आलं हसू, पाहा काय म्हणाला Watch Video)

आरसीबीने सध्या 1 विजयासह गुणतालिकेत तिसर्‍या क्रमांकावर तर पंजाब 1 पराभवासह 6 व्या क्रमांकावर आहे केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वातील पंजाब टीमला हंगामाच्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. पंजाब आणि दिल्ली यांच्यातील सामना टाय झाला ज्याचा निकाल नंतर सुपर-ओव्हरमध्ये लागला. पंजाबने दिल्लीला सुपर-ओव्हरमध्ये 3 धावा करण्याचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी सहज गाठले. दुसरीकडे, विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील आरसीबीने विजयासह हंगामाची सुरुवात केली आणि पहिल्या सामन्यात माजी विजेते सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. आता पंजाब आणि बेंगलोर आमने-सामने येतील. एकीकडे आरसीबी विजयाची गती कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील, तर पंजाब संघ मागील पराभव विसरून पुनरागमन करू पाहिलं.

किंग्स इलेव्हन पंजाब टीम: केएल राहुल (कॅप्टन), करुण नायर, मोहम्मद शमी, निकोलस पूरन, मुजीब उर रहमान, क्रिस गेल, मनदीप सिंह, मयंक अग्रवाल, हार्डस विल्जॉईन, दर्शन नालकंडे, सरफराज खान, अर्शदीप सिंह, हरप्रीत ब्रार, मुरुगन अश्विन, के गौतम, जे सुचीथ, ग्लेन मॅक्सवेल, शेल्टन कॉटरेल, दीपक हुड्डा, ईशान पोरेल, रवि बिश्नोई, जेम्स नीशाम, क्रिस जॉर्डन, तेजिंदर ढिल्लन आणि प्रभसिमरन सिंह.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: विराट कोहली (कॅप्टन), आरोन फिंच, शाहबाज अहमद, वॉशिंग्टन सुंदर, क्रिस मॉरिस, डेल स्टेन, नवदीप सैनी, पार्थिव पटेल (विकेटकिपर), एबी डिव्हिलियर्स, गुरकीरत सिंह मान, शिवम दुबे, मोईन अली, पवन नेगी, अ‍ॅडम झांपा, पवन देशपांडे, मोहम्मद सिराज, देवदत्त पड्डीकल, जोश फिलिप, युजवेंद्र चहल, उमेश यादव आणि ईसूरु उदाना.