फिलीटनेस आणि विराट कोहली (Virat Kohli) एकमेकांशी संबंधित आहेत. कोहली हा देशातील सर्वात फिट खेळाडूंपैकी एक आहे. यामुळेच फिट इंडिया चळवळीच्या (Fit India Movement) पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) कोहलीला त्यांच्या तंदुरुस्तीच्या रहस्याबद्दल विचारले आणि तो देखील यो-यो टेस्ट करतो का? भारत सरकारने (Government of India) सुरू केलेल्या या अभियानाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी गुरुवारी भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) कर्णधार कोहलीची भेट घेतली. या दरम्यान दोघांमध्ये एक रंजक संवाद झाला. अनिवार्य फिटनेसच्या दिनक्रमांबद्दल विचारले असता भारतातील सर्वात फिट क्रिकेटपटूंपैकी एक कोहलीने 'यो-यो टेस्ट'ने (Yo-Yo Test) भारतीय क्रिकेटपटूंना उच्च पातळीवरील फिटनेस मिळविण्यात कशी मदत केली याचे वर्णन केले. पंतप्रधान मोदींच्या 'यो-यो टेस्ट'बद्दलचा प्रश्न ऐकून विराटलाही हसू आलं. मात्र, त्याने मोदींच्या प्रश्ननाला यो-यो टेस्ट म्हणजे काय आणि ती का आवश्यक आहे याबद्दल सविस्तर माहिती दिली. (PM Modi Interacts with Fitness Influencers: फिट इंडिया मोहिमेच्या वर्षपूर्ती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयर्न मॅन मिलिंद सोमण याच्याशी साधला संवाद)
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आजकाल संघासाठी 'यो-यो टेस्ट' करवण्यात येत आहे. कर्णधाराला देखील ही टेस्ट द्यावी लागते? यावर भारताचा आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (आरसीबी)कर्णधार कोहली यो-यो टेस्ट फिटनेससाठी अतिशय महत्त्वाची असल्याचे म्हटले. कोहली हसला आणि म्हणाला की,‘‘फिटनेस दृष्टीकोनातून ही खूप महत्वाची टेस्ट आहे. जेव्हा आपण जागतिक स्तरावरील फिटनेसबद्दल बोलतो तेव्हा आम्ही अजूनही इतर संघांच्या मागे असतो आणि आम्हाला ही पातळी सुधारली पाहिजे.’’
Lively and informative Fit India Dialogue. #NewIndiaFitIndia https://t.co/A2QydE5znC
— Narendra Modi (@narendramodi) September 24, 2020
दरम्यान, 'यो-यो टेस्ट'मध्ये खेळाडूला दोन मीटरच्या अंतरावर असलेल्या दोन शंकूच्या दरम्यान सतत धावणे आवश्यक आहे. जेव्हा सॉफ्टवेअर प्रथम बीप देते, तेव्हा खेळाडू एका शंकूपासून दुसर्या शंकूकडे धावतो. जेव्हा खेळाडू दुसऱ्या कोनकडे पोहचतो तेव्हा दुसरी बीप ऐकू येते. अशाप्रकारे, वेळेची नोंद केली जाते आणि शेवटी सॉफ्टवेअरद्वारे फिटनेस स्कोअरद्वारे सांगते की तो खेळाडू तंदुरुस्त आहे की नाही. याचा वापर जगभरातील फुटबॉल, हॉकी आणि आता क्रिकेटमध्येही केला जातो. ऑस्ट्रेलियाने क्रिकेटमध्ये याची सुरुवात केली आणि आता जगातील जवळपास सर्वच संघ याचा वापर करतात.