KXIP vs MI, IPL 2020: किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात इंडियन प्रीमिअर लीगचा (Indian Premier League) 13वा सामना थोड्याच वेळात सुरु होईल. आजच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार केएल राहुलने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अबू धाबीच्या (Abu Dhabi) मैदानावर होणार्या या सामन्यात पंजाब आणि मुंबई विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील कारण यापूर्वी झालेल्या सामन्यामध्ये, दोन्ही संघांना आपापल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. आजच्या सामन्यासाठी मुंबईने अंतिम-11मध्ये एकही बदल, तर पंजाबने प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आणि कृष्णप्पा गौतमचे (Krishnappa Gowtham) मुरुगन अश्विनला सामील केले. मुंबईकडून चौथ्या स्थानावर इशान किशन कायम आहे. मागील सामन्यात इशानने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध शानदार 99 धावांचा डाव खेळला. एकीकडे पंजाबकडून राहुल आणि मयंकची जोडी जबरदस्त कामगिरी करत आहे, तर मुंबई युएईच्या खेळपट्टीवर संघर्ष करत आहे. (KXIP vs MI, IPL 2020 Live Streaming: किंग्स इलेव्हन पंजाब आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)
मुंबईकडून रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक डावाची सुरुवात करतील. सूर्यकुमार यादव, किशन, हार्दिक पांड्या, कीरोन पोलार्ड, क्रुणाल पंड्या मधल्या फळीची जबाबदारी सांभाळतील. राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह आणि कोल्टर-नाईलवर गोलंदाजीचा भार असेल. मागील तीन सामन्यात मुंबईची गोलंदाजीही कमकुवत दिसली आणि यंदा पंजाबविरुद्ध त्यांच्या गोलंदाजांना मोठी कामगिरी करावी लागणार आहे. दुसरीकडे, पंजाबचे सलामी फलंदाज केएल राहुल आणि मयंक अग्रवाल चांगल्या फॉर्मात आहेत आणि टीमसाठी पुन्हा डावाची सुरुवात करतील. मधल्या फळीची जबाबदारी करुण नायर, ग्लेन मॅक्सवेल, निकोलस पूरन, सरफराज खान आणि जेम्स नीशमवर अवलंबून असेल. रवी बिश्नोई, कृष्णप्पा गौतम, मोहम्मद शमी आणि शेल्डन कॉटरेल गोलंदाजी विभाग सांभाळतील.
किंग्स इलेव्हन पंजाब आणि मुंबई इंडियन्सचे प्लेइंग इलेव्हन:
किंग्स इलेव्हन पंजाब: केएल राहुल, मयंक अग्रवाल, करुण नायर, ग्लेन मॅक्सवेल, निकोलस पूरन, सरफराज खान, जेम्स नीशम, रवी बिश्नोई, कृष्णप्पा गौतम, मोहम्मद शमी आणि शेल्डन कॉटरेल.
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, कीरोन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह आणि जेम्स पॅटिन्सन.