कृष्णप्पा गौतम याचा डबल धमाका; एका मॅचमध्ये 39 चेंडूत ठोकले शतक आणि त्यानंतर घेतल्या 8 विकेट्स, पहा व्हिडिओ
कृष्णप्पा गौतम (Photo Credit: HotStar)

आयपीएल (IPL) मध्ये राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाकडून खेळणाऱ्या अष्टपैलू क्रिकेटपटू कृष्णाप्पा गौतम (Krishnappa Gowtham) याने शुक्रवारी बॉल आणि फलंदाजी या दोहोंसह चमकदार कामगिरी केली. कर्नाटकचा अष्टपैलू गौतमने कर्नाटक प्रीमियर लीग (KPL) मध्ये आपल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर अनेक दिग्गज फलंदाजांच्या पराक्रमाला मागे टाकले आणि अनेकांचे लक्ष वेधून घेतले. बेल्लारी टस्कर्स संघाकडून खेळत त्याने 56 चेंडूत 7 चौकार आणि 13 षटकारांच्या मदतीने 134 धावांची नाबाद खेळी केली. त्याने नम्मा शिवमोगा याच्या गोलंदाजीवर चांगली धुलाई केली आणि चौकार-षटकारांचा पाऊस पडला. इतकेच नाही तर गौतमने दुहेरी धमाका केला ज्याला टी-20 इतिहासाचे सर्वोत्कृष्ट कामगिरी म्हणता येईल.

या सामन्यात गौतमने बॅटिंग, बॉलिंग आणि क्षेत्ररक्षणाने महत्वपूर्ण कामगिरी बजावली. गोलंदाजी करताना गौतमने 4 ओव्हरमध्ये 15 धावा देऊन 8 विकेट्स घेतले. शिवाय, त्याने 2 झेलदेखील घेतले. असे असूनही गौतम जागतिक क्रिकेटच्या रेकॉर्ड बुकमध्ये स्थान मिळवू शकला नाही. त्याच्या या कामगिरीला केवळ करिश्मा म्हणता येईल. एकूणच असं वाटतं होतं की गौतम शिवमोगा लायन्स विरुद्ध सामना एकटाच खेळतोय. कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये बेल्लारी टस्कर्सकडून खेळत असताना गौतमने 39 चेंडूंत पहिले शतक ठोकले. केपीएलच्या इतिहासातील हे सर्वात वेगवान शतक होते. या संयत गौतमने 59 चेंडूंत नाबाद 144 धावांची खेळी केली, जी केपीएलच्या इतिहासातील सर्वात विक्रमी कामगिरी आहे. या खेळीदरम्यान गौतमचा स्ट्राईक रेट 239.29 होता. त्याने डावात 7 चौकार आणि 13 षटकार लगावले. पहा गौतमच्या या विक्रमी खेळीचा व्हिडिओ इथे:

यानंतर, 203 धावांच्या लक्ष्याचा बचाव करण्यासाठी बेल्लारी टस्कर्सकडून गौतम गोलंदाजी करायला आला तेव्हा त्याने फलंदाजीनंतर चेंडूने एक नवीन इतिहास रचला. गौतमने 4 ओव्हरमध्ये 15 धावा देत 8 विकेट्स घेतले. यात एका हॅट्ट्रिकचा देखील समावेश आहे. त्याच्या शानदार कामगिरीमुळे गौतमने आपल्या संघाला 70 धावांच्या फरकाने सामना जिंकल्यास मदत केली. दरम्यान, याआधी कोणत्याही खेळाडू टी-20 सामन्यात अशी अष्टपैलू कामगिरी करता आलेली नाही. या कामगिरीनंतरही गौतमच्या ट -20 रेकॉर्डमध्ये स्थान मिळवता आले नाही कारण राज्यातील टी-20 लीगला अजूनही अधिकृतपणे टी-20 सामन्याचा दर्जा मिळालेला नाही. त्यामुळे त्याच्या कामगिरीचा इतर टी-20 लीगच्या विक्रमांमध्ये समावेश करता येणार नाही. पण, गौतमच्या या अद्भुत प्रदर्शनानंतर त्याचा हा विक्रम कायम राहणार आहे.