कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स (Photo Credit: File Image)

आयपीएलच्या (IPL) 13 व्या सत्रात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) बुधवारी आमने-सामने येतील. अबू धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर होणार हा सामन्यात केकेआर (KKR) आपला पहिला तर मुंबई दुसरा सामना खेळेल. दोन्ही संघ जबदस्त फलंदाजांनी परिपूर्ण आहेत, अशा परिस्थितीत आज आणखी एक रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वातील मुंबईला पहिला पराभव विसरुन येथे विजय नोंदवायचा प्रयत्न करेल तर दिनेश कार्तिकच्या (Dinesh Karthik) नेतृत्वात कोलकाताला विजयी पदार्पण करू पाहत असेल. आयपीएलच्या आजच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर आमने-सामने येतील. सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल. भारतात प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. आपण या सामन्याचे थेट प्रवाह Disney+ Hotstar अ‍ॅपवर पाहू शकता. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात. (कोलकाता नाईट रायडर्स संघाचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल याने सरावदरम्यान चक्क कॅमेऱ्याच फोडला; पाहा व्हिडिओ)

4 वेळा विक्रमी चॅम्पियनशिप विजेते मुंबईला पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर मुंबई विजयी ट्रॅकवर येण्याचा प्रयत्न करेल. शिवाय युएई येथे खेळलेल्या एकही आयपीएल सामन्यात मुंबईला विजय मिळवता आलेला नाही, त्यामुळे आजच्या सामन्यात ते विजय मिळवण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करतील. दुसरीकडे, हंगाम सुरू करणारा कोलकाता हा शेवटचा संघ आहे. गेल्या हंगामात नाईट रायडर्सना प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नव्हते आणि शेवटच्या 6 सामन्यात संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र यंदा ते सुरुवातीपासूनच अधिक चांगली कामगिरी करू पाहतील.

येथे पाहा दोन्ही संघ

कोलकाता नाईट रायडर्स: शुभमन गिल, सिद्धेश लाड, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक (कॅप्टन आणि विकेटकीपर), रिंकू सिंह, नितीश राणा, सुनील नारायण, कुलदीप यादव, अली खान, लोकी फर्ग्युसन, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, प्रसिद्धि कृष्णा, संदीप वारियर, पॅट कमिन्स, इयन मॉर्गन, वरुण चक्रवर्ती, टॉम बंटन, राहुल त्रिपाठी, प्रवीण तांबे, एम सिद्धार्थ, क्रिस ग्रीन आणि निखिल नाईक

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कॅप्टन), दिग्विजय देशमुख, क्विंटन डी कॉक, आदित्य तारे, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह, धवल कुलकर्णी, नॅथन कोल्टर-नाईल, ट्रेंट बोल्ट, जेम्स पॅटिन्सन, जयंत यादव, सूर्यकुमार यादव, कुणाल पांड्या, कीरोन पोलार्ड, राहुल चाहर, क्रिस लिन, हार्दिक पांड्या, शेरफेन रदरफोर्ड, अनमोलप्रीत सिंह, मोहसिन खान, मिशेल मॅकक्लेनाघन, प्रिंस बलवंत राय सिंह, अनुकूल रॉय आणि इशान किशन.