Photo Credit- X

KKR vs LSG, TATA IPL 2025 Toss Update: आयपीएलच्या या हंगामातील 21 वा सामना आज म्हणजेच 8 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात खेळला जात आहे. नुकतीच नाणेफेक झाली. कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला (KKR vs LSG IPL 2025 Toss) आहे. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जाईल. हंगामात कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत आहे. तर, लखनऊ सुपर जायंट्सची कमान ऋषभ पंतच्या खांद्यावर आहे.

या हंगामात आतापर्यंत या दोन्ही संघांनी 2-2 विजय मिळवले आहेत. लखनऊ सुपर जायंट्स संघ सध्या पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानावर आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स संघ पाचव्या स्थानावर आहे. कोलकाता नाईट रायडर्सने त्यांच्या शेवटच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला होता. त्याशिवाय, अंगकृष्ण रघुवंशी आणि व्यंकटेश अय्यर यांनी अर्धशतके झळकावली होती.