श्रेयस अय्यर (Photo Credit: Twitter/IPL)

KKR vs DC, IPL 2020: इंडियन प्रीमियर लीग 2020 (Indian Premeir League) च्या 42व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यातील सामना थोड्याच वेळात सुरु अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर थोड्याच वेळात सुरु होईल. आजच्या सामन्यात डीसी (DC) कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांसाठी आजच्या सामन्यात विजय महत्वाचा आहे. एकीकडे विजयासह कॅपिटल्स यंदाच्या आयपीएल प्ले ऑफच तिकीट पक्क करतील, तर नाईट रायडर्ससाठी प्ले ऑफ शर्यतीतील आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय आवश्यक आहे. अशा स्थितीत आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल केलेले आहेत. दोन्ही संघांना आपापल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. दिल्लीला गेल्या लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाबने पराभूत केले तर कोलकाताला बेंगलोरविरुद्ध दारुण पराभव पत्करावा लागला होता. (KKR vs DC, IPL 2020 Live Streaming: कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)

डीसीने प्लेइंग इलेव्हनमधून पृथ्वी शॉ आणि यांना बाहेर केले असून त्यांच्या जागी अजिंक्य रहाणे आणि एनरिच नॉर्टजे यांना संधी दिली आहे. दिल्लीकडून शिखर धवन उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि त्याने शेवटच्या दोन्ही सामन्यात शतके ठोकली आहेत. कर्णधार श्रेयस अय्यर, विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंत, शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टोइनिस मधल्या फळीची जबाबदारी संभाळती. कगिसो रबाडा, एनरिच नॉर्टजे, हर्षल पटेल, अक्षर पटेल आणि आर अश्विन यांच्यावर गोलंदाजीची जबाबदारी असेल. दुसरीकडे, नाईट रायडर्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. सुनील नारायण आणि कमलेश नागरकोटीचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला असून टॉम बंटन आणि कुलदीप यादव यांना बाहेर केले आहेत. लोकी फर्ग्युसनने मागील सामन्यात प्रभावी गोलंदाजी केली होती आणि यंदाही त्याच्याकडून अशीच अपेक्षा असेल. केकेआरची फलंदाजी कमजोर आहे आणि आजचा सामना जिंकण्यासाठी त्यांना सुधार करण्याची गरज आहे.

पाहा केकेआर आणि डीसी प्लेइंग इलेव्हन 

कोलकाता नाईट राइडर्स: राहुल त्रिपाठी, शुभमन गिल, नितीश राणा, इयन मोर्गन, टॉम बंटन, दिनेश कार्तिक, पॅट कमिन्स, कुलदीप यादव, लोकी फर्ग्यूसन, प्रसिद्ध कृष्णा आणि वरुण चक्रवर्ती.

दिल्ली कॅपिटल्स: अजिंक्य रहाणे, शिखर धवन, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, मार्कस स्टोइनिस, शिमरॉन हेटमायर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, तुषार देशपांडे, कगिसो रबाडा आणि एनरिच नॉर्टजे.