कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स (Photo Credit: File Image)

KKR vs DC, IPL 2020 Live Streaming: आयपीएल (IPL) 2020 चा 42 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) दरम्यान खेळला जाईल. अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडीयमवर आजचा सामना खेळला जाईल. आयपीएल प्ले ऑफ (IPL Play Off) शर्यतीत कायम राहण्यासाठी केकेआरला आजचा सामना जिंकणे महत्वाचे आहे. केकेआर (KKR) आणि डीसी (DC) यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार आज, 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता टॉस होणार असून सामना 3.30 वाजता सुरु होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Disney+ Hotstar अ‍ॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत. ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात. (KXIP vs DC, IPL 2020: शिखर धवनने सलग दुसरी सेन्चुरी करत केला दमदार विक्रम, 'हा' पराक्रम करणारा बनला पहिलाच फलंदाज)

आतापर्यंत ही स्पर्धेत नाईट रायडर्सने मिश्र कामगिरी केली आहे. फ्रँचायझीने 10 पैकी 5 सामने जिंकले आहेत आणि 5 सामने गमावले आहेत. पण संघासाठी चांगली गोष्ट म्हणजे ती अजूनही पहिल्या-4 मध्ये कायम आहे. पण आता दिल्लीविरुद्ध केकेआरसमोर 'करा या मारा'ची स्थिती आहे कारण त्यांचा नेट रन-रेट कमी आहे आणि आता प्ले ऑफमध्ये पात्र होण्यासाठी त्यांच्याकडे चांगले गुण असणे गरजेचे आहे. दुसरीकडे, डीसी प्ले-ऑफ फेरीपासून फक्त एक पाऊल दूर आहे. आयपीएल13 मध्ये आतापर्यंत दिल्लीने 10 पैकी 7 सामने जिंकले आहेत आणि 14 गुणांसह पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.

पाहा केकेआर आणि डीसी संघ

कोलकाता नाईट रायडर्स: इयन मॉर्गन (कॅप्टन),  सुनील नारायण, टॉम बंटन, सिद्धेश लाड, कमलेश नगरकोटी, प्रसिद्ध कृष्णा,संदीप वॉरियर, शिवम मावी, रिंकू सिंह, क्रिस ग्रीन, एम सिद्धार्थ, निखिल नाईक, शुभमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आंद्रे रसेल, कुलदीप यादव, लोकी फर्ग्युसन, पॅट कमिन्स आणि वरुण चक्रवर्ती.

दिल्ली कॅपिटल्स: श्रेयस अय्यर (कॅप्टन), कगिसो रबाडा, पृथ्वी शॉ, ललित यादव, अवेश खान, अक्षर पटेल, तुषार देशपांडे, रिषभ पंत (विकेटकीपर), हर्षल पटेल, कीमो पॉल, एनरिच नॉर्टजे, डॅनियल सॅम्स, मार्कस स्टॉइनिस, संदीप लामिछाने, इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, शिमरॉन हेटमायर, अ‍ॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मोहित शर्मा.