नागपूर (Nagpur) येथे आयोजित करण्यात आलेल्या खासदार क्रिडा मोहोत्सव 2020 (Khasdar Krida Mahotsav 2020) साठी भारतीय संघातील ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्या याने उपस्थिती लावली होती. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी त्याला पाठीच्या त्रासामुळे क्रिकेट सामने खेळण्यास मनाई करण्यात आली होती. पण नागपूर मधल्या क्रिकेट मोहोत्सवाला त्याने उपस्थिती लावून त्याची शान वाढवली. या मोहोत्सवाला नितीन गडकरी यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा उपस्थिती दिसली. हार्दिक पांड्याने भाजपच्या या दोन दिग्गज नेत्यांसोबत क्रिकेट खेळताना दिसून आला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
हार्दिक पांड्याने भारतीय संघासोबत शेवटचा सामना सप्टेंबर 2019 मध्ये साऊथ अफ्रिका संघाच्या विरोधात खेळला होता. त्यानंतर आता नागपूर मधील खासदार क्रिकेट मोहोत्सवावेळी हार्दिक याला नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत क्रिकेट खेळताना स्पॉट करण्यात आले. या मोहोत्सवाला खेलो नागपूर खेलो अशी टॅगलाईन देण्यात आली होती. तसेच यामध्ये एकूण 32 विविध खेळांचा समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये बॅडमिंटन, कुस्ती, जिमनॅस्टिक, अॅथलेटिक्स, सायकलिंग, क्रिकेट, रायफल शूट यांसारखे अन्य खेळ उपलब्ध करुन देण्यात आले होते.(भारताचे माजी स्टार फिरकीपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन, राजेश चौहान आणि अमय खुरासिया BCCI निवड समितीच्या पदांसाठी भरले अर्ज)
Tweet:
VIDEO: नागपूरमध्ये गडकरी आणि फडणवीसांची बोलिंग, हार्दिक पांड्याची जोरदार फटकेबाजी#NitinGadkari #DevendraFadnavis #HardikPandya #Nagpur pic.twitter.com/Xx1o5LtddE
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 24, 2020
पांड्या याच्या क्रिकेट मधील सहभागाबाबत बोलायचे झाल्यास न्यूझीलंडच्या दौऱ्यावेळी त्याला दुखापत झाल्याने आणि फिटनेस टेस्ट अयशस्वी झाल्याने त्याला संघात स्थान देण्यात आले नाही. तर आता येत्या ODI सीरिजमध्ये पुन्हा साऊथ अफ्रिका संघाच्या विरोधात 2020 मध्ये होणाऱ्या सामन्यातून त्याला खेळण्याची संधी दिली जाणार आहे.