Kartik Tyagi (Photo Credit: Facebook)

आयपीएल 2020 च्या 20 सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने राजस्थान रॉयल्सविरूद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. राजस्थानच्या संघाला मागील दोन सामन्यात मिळालेल्या पराभवानंतर त्यांनी आपल्या संघात काही बदल केले आहेत. या हंगामात चांगले प्रदर्शन करण्यास असमर्थ ठरलेला जयदेव उनादकटला या सामन्यातून वगळण्यात आले आहे. त्याच्या ऐवजी उत्तरप्रदेशचा वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागीला (Kartik Tyagi) संधी देण्यात आली आहे. त्यागी हा आजच्या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहे. तर कार्तिक त्यागीबद्दल अधिक माहिती घ्या जाणून.

कार्तिक त्यागी भारतीय क्रिकेटपटू आहे. त्याने 2017-18 रणजी करंडक स्पर्धेत उत्तर प्रदेशसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर 5 फेब्रुवारी 2018 रोजी विजय हजारे ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेशसाठी पहिला सामना खेळला होता. डिसेंबर 2019 मध्ये त्याला अंडर-19 विश्वचषक क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या संघात स्थान देण्यात आले होते. आयपीएल 2020 च्या लिलावात राजस्थानच्या संघाने त्याला विकत घेतले होते. महत्वाचे म्हणजे, कार्तिक त्यागीने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये केवळ एकच सामना खेळला आहे. ज्यात त्याने 13.3 च्या सरासरीने 3 विकेट्स घेतले आहेत. तर, 'अ' श्रेणीच्या क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत 5 सामने खेळले असून त्यात 29.0 सरासरीने 9 विकेट्स घेतल्या आहेत. हे देखील वाचा- RR Vs MI 20th IPL Match 2020: मुंबई इंडियन्सच्या संघाने टॉस जिंकला; राजस्थान रॉयल्स प्रथम गोलंदाजी करणार

आयपीएलच्या गुणतालिकेत राजस्थान रॉयल्सचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे. तर, मुंबई इंडियन्सचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. या हंगामात राजस्थानच्या संघाने 4 सामने आहेत. यापैकी 2 सामन्यात विजयी तर, 2 सामन्यात पराभूत झाले आहेत. दुसरीकडे असलेला मुंबई इंडियन्सच्या संघाने या हंगामात चांगली सुरुवात केली आहे. मुंबईने 5 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. तर, 2 सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. यामुळे आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.