RR Vs KKR, IPL 2020: जयदेव उनादकट याने मारलेला चेंडू स्पाइडर कॅमेरा केबलला लागला? पंचांनी दिलेल्या निर्णायावर राजस्थान रॉयल संघाचे चाहते नाराज
Jaydev Unadkat after being adjudged out (Photo Credits: Twitter)

आयपीएलच्या तेराव्या हंगामातील बारावा सामना राजस्थान रॉयल आणि कोलकाता नाईट राईडर्स (RR vs KKR) यांच्यात पार पडला आहे. या सामन्यात कोलकाताच्या संघाने राजस्थानच्या संघावर 37 धावांनी विजय मिळवला आहे. राजस्थानच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या कोलकाताच्या संघाने राजस्थानच्या संघासमोर 6 बाद 174 धावा केल्या. कोलकाताने दिलेल्या लक्ष्याचे पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थानचा संघ केवळ 137 धावा करू शकला. मात्र, आठराव्या षटकात कुलदीप यादव गोलंदाजीवर जयदेव उनादकट (Jaydev Unadkat) फटका मारून झेलबाद झाला. पंरतु, हा चेंडू मैदानात असलेल्या कॅमेऱ्याला लागलेला असतानाही पंचानी उनादकट याला बाद घोषीत केले. पंचांनी दिलेल्या निर्यणावर राजस्थानच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

या समान्यात उनादकट आऊट नसतानाही पंचांनी त्याला आऊट दिले आहे, असा आरोप राजस्थानच्या चाहत्यांनी केला आहे. यामुळे पंचानी दिलेल्या निर्णयावर त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. एवढेच नव्हेतर, काहीजणांनी पंचांनी दिलेल्या निर्णयाची खिल्लीदेखील उडवली आहे. तसेच पंचानी हा बॉल डेड घोषीत करणे, अपेक्षित होते. परंतु, त्यांनी उनादकटला बाद केले, अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली आहे. हे देखील वाचा- IPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा; पाहा टॉप-5 फलंदाज

ट्विट-

ट्विट-

ट्विट-

ट्विट-

या सामन्यात कोलकाता नाईट राईडर्सने दुसरा विजय मिळवला आहे. तर, राजस्थानच्या संघाचा पहिल्यांदाच पराभव झाला आहे. पुढील सामना अतिशय महत्वाचा असून किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या यांच्यात पार पडणार आहे.