लता मंगेशकर नंतर एम एस धोनी च्या निवृत्तीवर जावेद अख्तर यांनी मांडले आपले मत, म्हणाले धोनीच्या निवृत्तीची चर्चा कशाला?
एम एस धोनी आणि जावेद अख्तर (Image Credit: Getty)

भारताच्या विश्वचषकमधील सेमीफायनलमधील पराभवानंतर माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्या निवृत्तीच्या चर्चा जोर पकडत आहे. धोनीच्या निवृत्तीबाबत अन्य क्षेत्रातील अनेकांनी आपली मतं प्रदर्शित केली आहे. भारत विश्वचषकमधून बाहेर पडताच बॉलीवूड ची कोकिळा म्हणून ओळखल्याजाणाऱ्या लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी धोनीच्या निवृत्तीसंदर्भात ट्विटवरून आपले मत मांडले होते. आता बॉलिवडूमधील आणखी एका व्यक्तीने धोनीच्या निवृत्तासंदर्भात वक्तव्य केले आहे. (ICC World Cup 2019: 'एम एस धोनी शिवाय टीम इंडिया जिंकूच शकत नाही', ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू स्टीव्ह वॉ याने केली 'कॅप्टन कूल' च्या समर्थानात बॅटिंग)

विश्वचषकनंतर निवृत्त धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा होत होत्या. त्यामुळे धोनी पुन्हा ब्लू जर्सीमध्ये पुन्हा दिसणार नाही अशी चर्चा स्पर्धेपूर्वीच सुरु झाली. सेमीफायनलमधील पराभवानंतर चाहत्यांना हा प्रश्न पडला आहे की ते धोनीला पुन्हा मैदानात पाहतील की नाही. धोनीने निवृत्ती घेऊ नये अशी विनंती चाहते करत आहेत. आणि आता लतादिदीं पाठोपाठ जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी देखील ट्विटकरून धोनीच्या निवृत्तीसंदर्भात स्वत:चे मत मांडले आहे. अख्तर ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत म्हणाले, "मधल्या फळीतील फलंदाज, विकेटकीपर म्हणून धोनीवर विश्वास ठेऊ शकतो. धोनीवर अवलंबून राहता येते. विराटने देखील मान्य केली आहे की मैदानात रणनिती ठरवताना धोनीचा उपयोग होतो. आपण सर्व जण पाहतोय की धोनीमध्ये अजून क्षमता आहे. असे असताना त्याच्या निवृत्तीबद्दल चर्चा का केली जात आहे?"

विश्वचषक स्पर्धेत धोनीच्या निराशाजनक कामगिरीमुळे चाहते त्याच्यावर चांगलेच नाराज आहे.