स्टीव्ह वॉ आणि महेंद्र सिंग धोनी (Photo Credit: Getty Images)

यंदाच्या आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकमध्ये भारताच्या पराभवाची जोरदार चर्चा सुरु आहे. विश्वचषकाच्या न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध सेमीफायनल सामन्यात टीम इंडिया (Team India) ला 18 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळं भारताचे विश्वचषकमधील आव्हान संपुष्टात आले. टीम इंडियासह माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्या खेळीविषयी देखील चाहते आणि क्रिकेट विश्लेषक यांच्यात चर्चा होत आहे. धोनीला इंग्लंमधील विश्वचषकमध्ये आपल्याला साजेशी कामगिरी करता आली नाही. (ICC World Cup 2019: एम एस धोनीला न्यूझीलंड विरुद्ध सेमीफाइनलमध्ये 7 व्या क्रमांकावर का पाठविले? वाचा रवि शास्त्री यांचे स्पष्टीकरण)

कित्येक जण धोनीला भारताचा पराभवासाठी जबाबदार धरत त्याच्यावर निशाणा साधला आहे. क्रिकेट जगतातील माजी खेळाडू देखील धोनीवर टीका करत आहे. पण यात एक अपवाद म्हणजे ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटर स्टीव्ह वॉ (Steve Waugh). वॉ आता धोनीच्या बाजूने बॅटिंग करत मैदानात उतरला आहे. धोनीचे समर्थन करत वॉ म्हणाला, "धोनीशिवाय सामना जिंकण्याची कोणतीच संधी निर्माण होत नाही. धोनीने भारतासाठी अनेक सामने जिंकले आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून तो अशाच पद्धतीने खेळत राहिला आहे. तो तुम्हाला जिंकण्याची परिस्थिती निर्माण करू शकतो आणि त्याच्याशिवाय सामना जिंकणं कठीण गोष्ट आहे."

एकीकडे धोनीच्या खेळीवर टीका केली जात आहे तर दुसरीकडे त्याच्या निवृत्तचि चर्चा जोर पकडत आहे. धोनी येत्या काही महिन्यात क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्याचे बोलले जात आहे.