IPL 2022 च्या लीडरबोर्डवर राजस्थान रॉयल्स संघाचे अधिराज्य, सर्व 6 स्थानांवर राजस्थानचे राजवाडी विराजमान
राजस्थान रॉयल्स (Photo Credit: PTI)

IPL 2022 Leaderboard: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15व्या हंगामात राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने धुमाकूळ घातला आहे. आयपीएल (IPL) 2022 मध्ये कोणत्याही संघाला धावांचा बचाव करणे कठीण होत आहे, परंतु संजू सॅमसनच्या (Sanju Samson) नेतृत्वाखालील संघाने आतापर्यंत 5 सामने धावांचा बचाव करताना जिंकले आहेत. अशा परिस्थतीत 2008 मध्ये पहिले आणि एकमेव आयपीएलचा किताब जिंकलेली राजस्थान फ्रँचायझी यंदाचे विजेतेपद काबीज करण्यासाठी आघाडीचे दावेदार मानले जात आहेत. इतकंच नाही तर राजस्थान रॉयल्स सध्या आयपीएल 2022 च्या पॉइंट टेबलमध्ये नंबर 1 च्या सिंहासनावर विराजमान आहे. याशिवाय लीडरबोर्डवरही राजस्थान रॉयल्सचा ताबा आहे. (IPL 2022, RR vs DC: जोस बटलर याची फटकेबाजी सुरुच, विराट कोहली याचा विक्रम मोडण्याच्या दिशेने वाटचाल, दिल्लीचे गोलंदाजही घायाळ)

राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत. आयपीएल 2022 च्या गुणतालिकेत 10 गुण आणि उत्तम नेट रनरेटच्या आधारे संघ आता पहिल्या क्रमांकावर आहे, तर संघातील खेळाडूंही लीडरबोर्ड जलवा दाखवत आहेत. आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक धावा असो, सर्वाधिक विकेट असो, सर्वात मोठी धावसंख्या किंवा फेअरप्ले पुरस्काराचा विषय असो, प्रत्येक बाबतीत संघ पहिल्या क्रमांकावर आहे. राजस्थान रॉयल्सचा स्टार सलामीवीर जोस बटलर (Jos Buttler) 491 धावांसह ऑरेंज कॅप परिधान करून आहे, तर 18 विकेट्स घेत युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने पर्पल कॅप काबीज केली आहे. रॉयल्सचा धडाकेबाज ओपनर बटलरने आयपीएल 2022 मध्ये फलंदाजाने केलेल्या सर्वाधिक 116 धावा ल्या आहेत. तसेच चहलने एका सामन्यात सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल 15 चा सर्वात मौल्यवान खेळाडू जोस बटलर आहे, ज्याच्या खात्यात 222 गुण आहेत. तर कर्णधार संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स 61 फेअरप्ले गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.

राजस्थान रॉयल्सचा गेल्या सामन्याबद्दल बोलायचे तर संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील रॉयल्सने दिल्लीचा 15 धावांनी पराभव करत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. राजस्थानच्या विजयाचा हिरो बटलरने शतक झळकावले. 223 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ निर्धारित 20 षटकात 207 धावाच करू शकला. दिल्लीला शेवटच्या षटकात 36 धावांची गरज होती. पॉवेलने तीन चेंडूत तीन षटकार मारून आशा उंचावल्या होत्या, मात्र वादग्रस्त नो-बॉलमुळे त्याची लय तुटली आणि तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. दिल्ली सतत नो बॉलची मागणी करत होती, पण अंपायरने नो बॉल दिला नाही. पॉवेलने अखेरीस 36 धावांची खेळी केली.