IPL 2022 New Format: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) आगामी 15 व्या हंगामाचा बिगुल वाजला आहे. या स्पर्धेचा लिलाव झाल्यापासून चाहते स्पर्धेच्या वेळापत्रकाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तथापि, आयपीएल अध्यक्ष ब्रिजेश पटेल (Brijesh Patel) यांनी आयपीएल (IPL0 2022 येत्या 29 मार्चपासून सुरू होणार असल्याची पुष्टी केली. आणि आता या स्पर्धेबाबत नवीन माहिती समोर आली आहे. आयपीएल 2022 यावर्षी पूर्णपणे भारतातच होणार आहे. मुंबईत 55 सामने आणि पुण्यात 15 सामने आयोजित केले जातील असे सांगण्यात येत आहे. 10 संघ एकूण 70 सामन्यापैकी प्रत्येकी 14 लीग सामने खेळतील, त्यानंतर 4 प्लेऑफ सामने होतील.तसेच एकूण 74 सामन्यांसाठी 10 आयपीएल संघ दोन गटात विभागले जातील असे वृत्त समोर येत आहे. (IPL 2022 Schedule: आयपीएलचे रणशिंग फुंकले! अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांची घोषणा, 26 मार्च रोजी पहिला सामना तर ‘या’ दिवशी अंतिम लढत)
आयपीएलच्या 15 व्या हंगामात एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. हे लक्षात घेऊन बीसीसीआयने स्पर्धेचे स्वरूप बदलले आहे. आयपीएल 2022 साठी 10 संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. अ गटात आणखी पाच संघ आणि ब गटात पाच संघ असतील. गट फेरीत एक संघ किमान 14 सामने खेळेल. प्रत्येक संघाला त्यांच्या गटात एकमेकांविरुद्ध दोनदा खेळण्याची संधी मिळेल. तर दुसऱ्या गटातील कोणत्याही एका संघाविरुद्ध दोन सामने खेळावे लागतील. तसेच या संघाचा गट त्यांनी जिंकलेल्या आयपीएल विजेतेपदावरून बनवला जाईल. उल्लेखनीय म्हणजे 2011 मध्ये देखील याच फॉरमॅटनुसार सामने खेळवले गेले होते. एक व्हर्च्युअल गट खाली नमूद केल्याप्रमाणे आहे.
Official from @BCCI:
The 10 teams will play a total of 14 league matches (7 home matches, 7 away matches) totalling to 70 league matches, followed by the 4 playoff matches. Each team will play 5 teams twice and the remaining 4 teams only once (2 only home, 2 only away)#IPL2022
— Subhayan Chakraborty (@CricSubhayan) February 25, 2022
संघांचा गट कसा असेल ते पहा:
The 10 IPL teams will be divided into two groups for a total of 74 matches in the 2022 edition that will also include the playoffs and final.
Here are the two groups (ranked according to the number of titles they've won) pic.twitter.com/olEPPQxSqR
— KSR (@KShriniwasRao) February 25, 2022
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साखळी टप्प्यातील 70 सामने मुंबई आणि पुणे येथे खेळल्यानंतर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्ले-ऑफ सामने खेळवले जाऊ शकतात. तर दोन्ही गटातील अव्वल 2 संघ प्ले-ऑफसाठी पात्र ठरतील. वानखेडे स्टेडियम आणि DY पाटील स्टेडियमवर प्रत्येकी 4 तर, ब्रेबॉर्न स्टेडियम (CCI) आणि MCA आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे येथे प्रत्येकी 3 सामने खेळले जातील.