अर्जुन तेंडुलकर (Photo Credits: Instagram/Arjun Tendulkar)

Arjun Tendulkar IPL Debut: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier Legue) 2022 ची मोहिम आता आपल्या शेवटच्या टप्प्यात आहे आणि स्पर्धेतील सर्वात यशस्वी फ्रँचायझी मुंबई इंडियन्सकडे गमावण्यासारखे काहीच नाही. प्ले-ऑफ शर्यतीतून लवकर बाहेर पडल्यानंतर 5 वेळचे चॅम्पियन भविष्यावर लक्ष ठेवून आगामी सामन्यांमध्ये त्यांची बेंच स्ट्रेंथ तपासण्याचा प्रयत्न करतील. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या आगामी आयपील (IPL) 2022 च्या 10 व्या सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेदरम्यान प्रश्नांना उत्तर देताना, मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने (Mahela Jayawardene) यांनी अर्जुन तेंडुलकरला पदार्पणाची (Arjun Tendulkar IPL Debut) संधी देण्याच्या शक्यतेवर आपले विचार शेअर केले. अर्जुनला आयपीएल 2022 च्या लिलावात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 30 लाख रुपयांत खरेदी होते. उल्लेखनीय म्हणजे, युवा डावखुरा वेगवान गोलंदाजा गुजरात टायटन्सकडून 25 लाख रुपयांची बोली आकर्षित केली. (IPL 2022: रोहित शर्माकडून कॅप मिळाली आणि ‘या’ खेळाडूचा बदलला खेळ, आयपीएलमध्ये करतोय धमाकेदार कामगिरी)

“मला वाटते की प्रत्येकजण संघात एक पर्याय आहे. गोष्टी कशा होतात ते आपण पाहू. हे मॅच-अप्स आणि आम्ही सामने कसे जिंकू शकतो याबद्दल आहे आणि आम्हाला योग्य मॅच-अप मिळतील याची खात्री करणे हे आमचे प्राधान्य आहे. प्रत्येक सामना ही आत्मविश्वासाची गोष्ट आहे, आम्ही आमचा पहिला विजय मिळवण्यात यशस्वी झालो व ते एकत्र विजय मिळवून आत्मविश्वास परत मिळवण्याबद्दल आहे. हे सर्वोत्कृष्ट खेळाडूंना मैदानात उतारवण्याबद्दल आहे. जर अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) त्यांच्यापैकी एक असेल, तर आपण त्याचा विचार करू, परंतु हे सर्व आपण मांडलेल्या संयोजनावर अवलंबून आहे,” महेला जयवर्धने म्हणाले. दुखापतीमुळे अर्जुन UAE मधील स्पर्धेच्या दुसऱ्या सहामाहीत आयपीएल 2021 उर्वरित मोसमातून बाहेर पडला. संपूर्ण मोसमात तो एकही सामना खेळला नाही. युवा क्रिकेटरने जानेवारी 2021 पासून स्पर्धात्मक क्रिकेट खेळले नसतानाही अर्जुनला मुंबई इंडियन्समध्ये संधी देण्यात आली.

युवा कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी मुंबई इंडियन्स ओळखले जातात आणि गेल्या काही वर्षांपासून त्यांनी सातत्याने असे केल्याने त्यांना फायदा झाला आहे. या वर्षी त्यांच्या निराशाजनक मोहिमेत माजी चॅम्पियन्स संघाने दक्षिण आफ्रिकेतील डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, हृतिक शोकीन आणि कुमार कार्तिकेय यांच्यासह आशादायक तरुण प्रतिभांना पदार्पणाची संधी दिली आहे. विशेष म्हणजे, या सर्वांनी त्यांच्या संधी मिळवण्यात आणि त्यांच्या मोहिमेच्या विविध टप्प्यांवर संघासाठी योगदान दिले. तसेच कार्तिकेय, शोकीन, वर्मा यांच्या उपयुक्त योगदानासह सूर्यकुमार यादवच्या मॅच-विनिंग अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने 30 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्धची 8 सामन्यांची पराभवाची मालिका संपुष्टात आणली.