IPL 2022 Mega Auction: भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) देखील आयपीएल (IPL) 2022 मेगा लिलावाचा भाग आहे आणि या खेळाडूने लिलावापूर्वी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. रहाणेच्या म्हणण्यानुसार या लीगमध्ये त्याचा उत्कृष्ट रेकॉर्ड आहे आणि तो आगामी स्पर्धेसाठी उत्सुक आहे. मेगा लिलावात अजिंक्य रहाणेची मूळ किंमत 1 कोटी ठेवण्यात आली असून अनेक संघ त्याला बॅकअप खेळाडू म्हणून खरेदी करू शकतात. तथापि भारतीय कसोटी संघाच्या (India Test Team) माजी उपकर्णधाराला आशा आहे की जो संघ त्याला विकत घेईल तो त्याला नियमित संधी देईल. रहाणेने 2018 मध्ये भारतासाठी शेवटचा व्हाईट-बॉल सामना खेळला आहे. (Ajinkya Rahane: ऑस्ट्रेलिया दौरा 2020-21 वर अजिंक्य रहाणेची बोल्ड प्रतिक्रिया, म्हणाला - ‘माझे श्रेय दुसरे घेऊन गेले’; समीक्षकांना दिले सडेतोड उत्तर)
मुंबईच्या टॉप ऑर्डर फलंदाजासाठी 2021 कठीण काळ ठरला जिथे त्याने 13 कसोटी सामन्यांमध्ये 20.82 च्या सरासरीने केवळ 479 धावा केल्या. तसेच अनेक जाणकारांनी संघातील त्याच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि कसोटी विशेषज्ञ जर त्याने आपली कामगिरी उंचावली नाही तर त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची देखील शक्यता आहे. परंतु 33 वर्षीय रहाणे आयपीएल मेगा लिलावापूर्वी आत्मविश्वासाने भरपूर आहे. “मी माझ्याबद्दल बोलत नाही, पण माझा आयपीएल रेकॉर्ड खरोखर चांगला आहे. विशेषत: राजस्थान रॉयल्ससाठी, मी 7-8 वर्षे खेळलो आहे. गेल्या 2 वर्षांत मला जास्त खेळायची संधी मिळाली नाही, पण मला विश्वास आहे. माझ्यासाठी हे सर्व सामने खेळण्याबद्दल आहे, व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण खेळण्याबद्दल आहे. म्हणून, मी त्याची वाट पाहत आहे,” रहाणेने क्रीडा पत्रकार बोरिया मजुमदार यांना त्याच्या यूट्यूब शो ‘बॅकस्टेज विथ बोरिया’वर सांगितले.
टी-20 लीगमध्ये रहाणेच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर त्याने आतापर्यंत खेळलेल्या 151 आयपीएल सामन्यांमध्ये 31.53 च्या सरासरीने आणि 121.34 च्या स्ट्राइक रेटने 3941 धावा केल्या आहेत. गेल्या वर्षी, रहाणे मागील आयपीएल हंगामातही आपला सर्वाधिक वेळ बाजूला बसून घालवला जेथे तो दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता. IPL 2022 साठी खेळाडूंचा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी होणार असून 2 कोटी ही सर्वोच्च राखीव किंमत आहे. यामध्ये तब्बल 48 खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.