Ajinkya Rahane: ऑस्ट्रेलिया दौरा 2020-21 वर अजिंक्य रहाणेची बोल्ड प्रतिक्रिया, म्हणाला - ‘माझे श्रेय दुसरे घेऊन गेले’; समीक्षकांना दिले सडेतोड उत्तर
अजिंक्य रहाणे (Photo Credit: PTI)

ऑस्ट्रेलियात भारताच्या (India Tour of Australia) ऐतिहासिक यशाला एक वर्षाहून अधिक काळ लोटल्यानंतर, तत्कालीन कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) – ज्याला अ‍ॅडलेड कसोटी  (Adelaide Test) सामन्यानंतर विराट कोहली मायदेशी परतल्यावर संघाचा कर्णधार बनवण्यात आला होता – एक धाडसी विधान केले आहे. ‘बॅकस्टेज विथ बोरिया’ वर बोलताना रहाणेने कबूल केले की श्रेय घेणे हा त्याचा स्वभाव नाही आणि ते कोणीतरी घेतले. गेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये  (Border-Gavaskar Trophy) संघाच्या मेलबर्नमधील भारताच्या विजयाचा नायक रहाणे अलीकडच्या काळात बॅटने खराब प्रदर्शनामुळे चर्चेत राहिला आहे. रहाणे दैनंदिन बाबींवर किंवा त्याच्याबद्दल काय लिहिले आणि सांगितले जाते यावर मत प्रदर्शित करणारा व्यक्ती नाही तथापि, भारताच्या माजी उपकर्णधाराने ऑस्ट्रेलियाच्या ऐतिहासिक 2020-21 दौऱ्यासह त्याच्या कारकिर्दीबद्दल काही लक्षवेधी टिप्पण्या केल्या आहेत. (IND vs SL Test 2022: टीम इंडियाच्या ‘या’ धुरंधर खेळाडूंना श्रीलंकाविरुद्ध कसोटी मालिकेतून बसावे लागणार बाहेर, भारतीय टेस्ट संघात बदलाची सुरुवात)

‘बॅकस्टेज विथ बोरिया’ या चॅटमध्ये रहाणेने त्याच्या कारकिर्दीशी संबंधित अनेक बाबींवर मौन सोडले. ऐतिहासिक बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीबद्दल बोलताना रहाणेने एक धाडसी टिप्पणी केली आणि म्हणाला  की त्याने मैदानावर तसेच ड्रेसिंग रूममध्ये काही निर्णय घेतले, परंतु त्याचे श्रेय दुसऱ्याने घेतले. “जेव्हा लोक म्हणतात की माझी कारकीर्द संपली आहे तेव्हा मी हसतो, ज्यांना खेळ माहित आहे ते असे बोलत नाहीत - ऑस्ट्रेलियात काय घडले ते सर्वांना माहित आहे/त्यापूर्वीही, लाल चेंडूत माझे योगदान - जे लोक खेळावर प्रेम करतात ते समजूतदारपणे बोलतील,” रहाणे म्हणाला. “ऑस्ट्रेलिया मालिकेत मी काय केले हे मला माहीत आहे आणि तिथे जाऊन श्रेय घेण्याचा माझा स्वभाव नाही. मी घेतलेले काही निर्णय होते, पण श्रेय दुसऱ्याने घेतले. मालिका जिंकणे माझ्यासाठी महत्त्वाचे होते,” संघाचा विजय त्याच्यासाठी महत्त्वाचा आणि ‘वैयक्तिक श्रेय’ नाही असे स्पष्ट करून तो पुढे मुलाखतीत म्हणाला.

अ‍ॅडलेड येथे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटीत भारताच्या लज्जास्पद पराभवानंतर रहाणेने मेलबर्नमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात शतक झळकावून संघाला विजय मिळवून देण्यात प्रमुख भूमिका बजावली. भारताने सिडनी कसोटी अनिर्णित राखून गाब्बा येथील अंतिम लढत जिंकली. रहाणेने त्यावेळच्या संघाच्या ऐतिहासिक विजयासाठी अनेकांची वाहवा मिळवली होती, परंतु सध्या संघातील त्याचे स्थान धोक्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या खराब दौऱ्यानंतर रहाणे मुंबईसाठी रणजी ट्रॉफी खेळण्यास सज्ज आहे. श्रीलंका मालिकेसाठी निवडीसाठी त्याचा विचार केला जाणार नसल्याचे वृत्त समोर आले असले तरी अनुभवी फलंदाज देशांतर्गत मैदानात आपली क्षमता प्रदर्शित करण्यास उत्सुक असेल.