IND vs SL Test 2022: टीम इंडियाच्या ‘या’ धुरंधर खेळाडूंना श्रीलंकाविरुद्ध कसोटी मालिकेतून बसावे लागणार बाहेर, भारतीय टेस्ट संघात बदलाची सुरुवात
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

भारतीय कसोटी संघात (Indian Test Team) बदलाचे वारे वाहू लागले आहेत.  BCCI निवडकर्ते आणि भारतीय संघ व्यवस्थापनाने भारतीय कसोटी क्रिकेट संघाच्या FAB-FOUR मधून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार इशांत शर्मा (Ishant Sharma) रणजी करंडक मधून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे, तर रिद्धिमान साहाने (Wriddhiman Saha) आधीच माघार घेतली आहे आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) व अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांच्यासाठी वाट कठीण आहे. त्यामुळे, श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) आगामी मायदेशात होणारी कसोटी मालिका डोळ्यासमोर ठेवून बदल सुरू झाल्याचे दिसत आहे. तसेच रणजी करंडक खेळणाऱ्या पुजारा आणि रहाणेला देखील केवळ एक शतकापेक्षा जास्त फरक पाडाव लागेल कारण त्यांचा खराब फॉर्म दीर्घकाळापासून चालला आहे आणि एक चांगली खेळी कदाचित आधीच झालेले नुकसान भरून काढू शकत नाही. (Wriddhiman Saha साठी राष्ट्रीय संघाचे दरवाजे बंद? श्रीलंका कसोटी मालिकेत स्थान मिळणार नसल्याने बंगाल रणजी संघातून बाहेर पडला)

पीटीआयच्या वृत्तानुसार इशांत शर्मा रणजी करंडक मधून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे, तर रिद्धिमान साहाने आधीच माघार घेतली आहे आणि चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांच्यासाठी वाट कठीण आहे. त्यामुळे, श्रीलंकेविरुद्ध आगामी मायदेशात होणारी कसोटी मालिका डोळ्यासमोर ठेवून बदल सुरू झाल्याचे दिसत आहे. तसेच रणजी करंडक खेळणाऱ्या पुजारा आणि रहाणेला देखील केवळ एक शतकापेक्षा जास्त फरक पाडाव लागेल कारण त्यांचा खराब फॉर्म दीर्घकाळापासून चालला आहे आणि एक चांगली खेळी कदाचित आधीच झालेले नुकसान भरून काढू शकत नाही.

33 वर्षीय इशांत सध्याच्या भारतीय कसोटी सेटअपमधील सर्वात अनुभवी खेळाडू आहे . इशांतने ज्यामध्ये 105 कसोटी सामने खेळले आणि 311 विकेट्स घेतल्या आहेत परंतु इंग्लंड दौऱ्यापासून तो संघर्ष करत आहे. बुधवारी, दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन (DDCA) निवड समितीने रणजी संघाची निवड करण्यासाठी बैठक घेतली आणि निवडकर्ते तसेच पदाधिकारी इशांतच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतानाही संध्याकाळपर्यंत त्यांना त्याच्या उपलब्धतेबद्दल पुष्टी मिळू शकली नाही. याशिवाय दक्षिण आफ्रिकेत तीन कसोटी सामने खेळणाऱ्या पहिल्या पाच वेगवान गोलंदाजांमध्ये इशांतचाही विचार केला गेला नव्हता. श्रीलंकेविरुद्ध टीम इंडिया मोहाली आणि बेंगळुरू येथे दोन कसोटी सामने खेळणार आहे ज्यामध्ये दोन वेगवान गोलंदाज शमी आणि बुमराह व तिसरा सिराज असेल.

दुसरीकडे, रहाणे आणि पुजारा या दोनच व्यक्तींना थोडासा वाढीव कालावधी मिळाला आहे. त्यांना श्रीलंकेविरुद्ध त्यांना निवडण्याची निश्चितता नसली तरी त्यांच्या बाबतीत संघ व्यवस्थापनाची इच्छा आहे की त्यांनी रणजी ट्रॉफी खेळावी, याचा अर्थ असा की त्यांनी ठराविक कालावधीत जास्त धावा केल्या तर पुनरागमनाची संधी मिळू शकते. रहाणे आणि पुजारा यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेची सुरुवात एकमेकांविरुद्ध करतील आणि संघात त्यांची जागा टिकवून ठेवण्यासाठी ते सर्वस्व पणाला लावतील.

PTI इनपुटसह.