IPL 2022 Venues: महाराष्ट्रात होणार आयपीएल 15 चा रोमांच, स्पर्धेसाठी दोन स्थळे निश्चित; BCCI लवकरच करणार घोषणा
वानखेडे स्टेडियम (Photo Credits: PTI)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 15 साठी खेळाडूंचा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी होणार आहे. आयपीएल लिलावाचे (IPL Auction) काउंटडाउन सुरु झाले असताना देशात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांची या वर्षी स्पर्धा भारतात खेळली जाणार की नाही यावर अजून संभ्रमाची स्थिती बनली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार यावर्षी आयपीएलचा (IPL) रोमांच संपूर्णपणे मुंबईत खेळली जाईल असे म्हटले होते. यादरम्यान आयपीएल 2022 यंदा 27 मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे आणि BCCI ने लीगच्या 15 व्या हंगामासाठी त्यांची ठिकाणे निश्चित केली असल्याचे समजले जात आहे. बीसीसीआय (BCCI) अधिकारी, आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल आणि फ्रँचायझी मालक यांच्यात ही बैठक झाली जिथे चार ठिकाणे निश्चित करण्यात अली. आयपीएल 2022 चा हंगाम या वर्षांपासून 10 संघांमध्ये खेळला जाईल ज्यामध्ये तब्बल 74 सामने खेळले जातील. (IPL 2022: यावर्षीही आयपीएलची परदेश वारी? UAE किंवा भारतात नव्हे ‘या’ देशात होऊ शकते टी-20 लीगचे आयोजन)

मुंबईतील तीन स्टेडियम - वानखेडे, ब्रेबॉर्न आणि नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम - आणि पुणे ही संभाव्य ठिकाणे म्हणून निवडली गेली आहेत. सुरुवातीच्या चर्चेनुसार बीसीसीआय ही स्पर्धा महाराष्ट्रात आयोजित करायची आहे आणि पहिला सामना मुंबईत होण्याची शक्यता आहे. पण नंतर मुंबईशी जवळीक पाहता पुणे देखील चित्रात आले. लक्षात घ्यायचे की यापैकी कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी हवाई-प्रवासाची आवश्यकता नाही आणि या स्टेडियममध्ये व आजूबाजूला बायो-बबल निरोगी ठेवणे देखील सोपे होईल कारण 5 स्टार हॉटेल्स जवळपास आहेत. आयपीएल लिलावापर्यंत बोर्ड वाट आणि या दरम्यान आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल फ्रँचायझींची भेट घेईल. या बैठकीनंतर बीसीसीआय आयपीएलच्या स्थळाची अधिकृत घोषणा करेल.

दरम्यान, मुंबईतील कोविड प्रकरणांचे गांभीर्य लक्षात घेता बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेला एक व्यवहार्य पर्याय म्हणून ठेवले आहे. मुंबईतील परिस्थितीवर लक्ष ठेवून 20 फेब्रुवारीपर्यंत स्थळांबाबत अंतिम निर्णय फ्रँचायझींना सांगितला जाईल. दुसरीकडे, आयपीएल 2022 यूएई आयोजित करण्याच्या शक्यतेवरही बैठकीत चर्चा करण्यात आली. फ्रँचायझी मालकांनी एकूण खर्च कमी करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेपेक्षा यूएईला प्राधान्य दिले. UAE मध्ये यापृवी 2020 आणि 2021 या दोन आयपीएल सीझनचे यशस्वी आयोजन केले. तथापि, दव घटकाने खेळांच्या निकालावर मोठी भूमिका बजावली. यूएईमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकातही हेच पाहायला मिळाले.