IPL 2022: यावर्षीही आयपीएलची परदेश वारी? UAE किंवा भारतात नव्हे ‘या’ देशात होऊ शकते टी-20 लीगचे आयोजन
आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: Twitter/IPL)

कोविड-19 चे काळे ढग पुन्हा एकदा इंडियन प्रीमियर टी-20 लीगवर (Indian Premier League) घिरट्या घालत आहेत. टूर्नामेंटची 2022 आवृत्ती कोठे आयोजित केली जाईल याबद्दल काही स्पष्टता समोर आली नाही. या दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) प्लॅन बी म्हणून आगामी हंगामासाठी दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि श्रीलंका (Sri Lanka) ही संभाव्य ठिकाणे ठेवत असल्याचे वृत्त समोर आले आहे. भारतीय बोर्डाची मूळ योजना लीगच्या 15 व्या आवृत्तीसाठी 10 ठिकाणे वापरून होम-अवे फॉरमॅटमध्ये स्पर्धा खेळवण्याची आहे. तथापि, कोविड-19 ची तिसरी लाट (COVID 3rd Wave) अद्याप त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात असल्याचे दिसत असताना, येत्या दोन महिन्यांत देशात विषाणूची स्थिती काय असेल याबद्दल फारसे काही सांगता येत नाही. शिवाय संपूर्ण लीग महाराष्ट्रात आयोजित करण्याचा विचारही बीसीसीआय (BCCI) करत आहे. तथापि, राज्यात सध्या देशात सर्वाधिक कोविड-19 प्रकरणे नोंदवली जात असल्याने ही योजना पाहिजे तितकी फलदायी दिसत नाही. (IPL 2022 Venue: या वेळी आयपीएलचा संपूर्ण हंगाम महाराष्ट्रातच? कोविड-19 स्थिती लक्षात घेत  BCCI प्लॅन ‘बी’च्या विचारात)

त्यामुळे, इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार भारतातील कोरोनाची स्थिती सुधारली नाही तर बोर्ड टी-20 लीग दक्षिण आफ्रिका किंवा श्रीलंकेत आयोजित करेल. UAE, जिथे आयपीएल 2020 मध्ये पूर्णतः आणि 2021 मध्ये अंशतः आयोजित करण्यात आले होते, ते एकमेव व्यवहार्य बॅकअप पर्याय म्हणून पाहिले जात नाही. अशा परिस्थतीत देशभरात कोविड-19 ची स्थितीमध्ये सुधार न झाल्यास आयपीएलची सलग दुसऱ्यांदा परदेश वारी ठरेल. दरम्यान, भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेत आहे जिथे 3 सामन्यांची कसोटी मालिका संपल्यानंतर ते 3 वनडे सामने खेळणार आहेत. जरी सुरुवातीला भारताच्या आफ्रिकी दौऱ्यावर शंका असल्या तरी द्विपक्षीय मालिका ज्या पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे, त्यामुळे BCCI ला आयपीएल 2022 साठी संभाव्य पर्याय म्हणून पाहण्याची संधी दिली आहे.

दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेमध्ये ओमिक्रॉनचा धोका आधीच टळला आहे, देशाने अंदाजे एक महिन्यापूर्वी लादलेले निर्बंध देखील हटवले आहेत. त्यामुळे, भारत असुरक्षित राहिल्यास आयपीएल सीजन 2022 चे यजमानपदासाठी दक्षिण आफ्रिका करण्यास एक सक्षम पर्याय असू शकतो. “दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ ज्या ठिकाणी थांबला होता ती जागा अनेक एकरांमध्ये पसरलेली आहे. या रिसॉर्टमध्ये वॉकिंग ट्रॅक आणि एक तलाव देखील होता व यामुळे गेल्या काही वर्षांपासून अनेक परदेशी दौऱ्यांवर त्यांच्या खोलीत बंदिस्त असलेल्या खेळाडूंसाठी गोष्टी सुलभ झाल्या आहेत. अशा परिस्थितीत, बायो-बबलमध्ये राहूनही अशा रिसॉर्टमध्ये खेळाडूंना कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही.”