‘IPL 2021 लिलावात झहीर खानने नाव घेतलं व माझ्या डोळ्यात अश्रू आले,’ मुंबई इंडियन्सच्या युवा गोलंदाजानेने सांगितला भावनिक अनुभव
युद्धवीर सिंह (Photo Credit: Instagram)

IPL 2021: जम्मू-काश्मीरचा (Jammu-Kashmir) युवा वेगवान गोलंदाज युद्धवीर सिंह (Yudhvir Singh) चरकला इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 पूर्वी झालेल्या लिलावात पाच वेळा आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 20 लाखांच्या बेस प्राईसवर खरेदी केले. मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी ओळखली जाते. यामध्ये आता जम्मू-काश्मीरच्या युद्धवीर सिंहचे नाव देखील सामील झाले आहे. माजी खेळाडू आणि मुंबई संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक झहीर खानने (Zaheer Khan) आयपीएल लिलावात जेव्हा युद्धवीरचं नाव घेतलं तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू आले असं गोलंदाजाने म्हटलं. मुंबई इंडियन्सने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यामध्ये चरक म्हणाला की, “मला माहित होते की माझे नाव पुकारले गेले तर ते अखेरचे असेल. आणि नाही तर ठीक आहे. लिलावावेळी मी आणि माझे कुटुंब टीव्हीवर डोळे टिकून ठेवून होतो. पण लिलावावेळी झहीरने माझं नाव घेतलं तेव्हा डोळ्यातून अश्रू आले,” युद्धवीरने सांगितले. (IPL 2021: पाच वेळचे चॅम्पियन मुंबई इंडियन्सला यंदा आयपीएल जेतेपदासाठी कोणता संघ देऊ शकतो टक्कर, Aakash Chopra यांनी या टीमवर लावला दाव)

त्याने पुढे म्हटले की, “ते माझ्यासाठी किती अविश्वसनीय होते हे मी सांगू शकत नाही. मुंबईसाठी निवड होणे हे माझ्यासाठी आणि माझे राज्य जम्मू-काश्मीरसाठी मोठी गोष्ट होती. माझ्या राज्यातल्या संघातील माझ्याकडून मोठ्या अपेक्षा होती. मी सामना खेळणार आणि माझ्या राज्याचे नाव रोशन करीन.” सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हैदराबादचे प्रतिनिधित्व करणारा चरकला मुंबई इंडियन्सने यंदाच्या आयपीएलच्या लिलावात 20 लाख रुपयांच्या बेस प्राइससाठी खरेदी केले. 23 वर्षीय युद्धवीरने आपल्या कारकीर्दीत फक्त दोन प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत आणि 2 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने 6 टी -20 सामन्यात 3 विकेटही घेतले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)

मुंबई इंडियन्स टीमचे मॅनेजर राहुल संघवी म्हणाले की, “आम्ही नेहमीच प्रतिस्पर्धी खेळाडूंना निवडण्यात चांगले आहोत, जे आम्ही यंदा देखील केले युद्धवीर आणि अर्जुनची (तेंडुलकर) निवड करून. युएई मधील आयपीएलमध्ये हे दोघेही आमच्या समर्थन खेळाडूंच्या गटाचा भाग होते. आम्ही पहात असलेली भूमिका ही मुले पूर्ण करतील आणि आम्ही त्यांना निवडले यावर प्रशिक्षकांचे समाधानी आहेत.” झहीर म्हणाला, “आमच्याकडे युद्धवीर आहे, ज्यासाठी आम्ही देखील उत्सुक आहोत. या वातावरणाचा सहभागी सर्वांनाच फायदा होत आहे. आम्ही त्यांना वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी, क्षणाक्षणाचा आस्वाद घेण्यासाठी आणि तसेच असताना शिकण्यास प्रोत्साहित करतो.”