IPL 2021: माजी भारतीय फलंदाज आणि लोकप्रिय भाष्यकार आकाश चोपडा (Aakash Chopra) यांनी इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 विजेतेपदासाठी मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) आव्हान देण्यास सक्षम संघ म्हणून दिल्ली कॅपिटल्सची (Delhi Capitals) निवड केली. नियमित कर्णधार श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत दिल्ली संघ यंदा रिषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वात पहिल्या विजेतेपदाच्या उद्देशाने मैदानावर उतरेल. रविचंद्रन अश्विन, अजिंक्य रहाणे, शिखर धवन आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यासारख्या काही उत्कृष्ट सुपरस्टार्सचा दिल्ली कॅपिटल्स संघात समावेश आहे पण संघ व्यवस्थापनाने पंतवर नेतृत्वाची जबाबदारी सोपवली आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओमध्ये चोपडा यांनी आयपीएल 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संभाव्यतेचे विश्लेषण केले आणि मुंबई इंडियन्सला टक्कर देण्यास सक्षम संतुलित टीम म्हणून उल्लेख केला. (IPL 2021: मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये या खेळाडूंना स्थान मिळणं कठीण, बेंचवर बसून राहावे लागेल बहुतेक हंगाम)
“या संघात बरीच शक्ती आहे. ही माझ्या आवडीचा संघ आहे जो कागदावर भक्कम दिसतो. तो मुंबई इंडियन्सला स्पर्धा देऊ शकतात. संतुलनाचा दृष्टीने त्यांनी सर्व विभागात सुधार केला आहे,” चोपडा म्हणाले. विशेष म्हणजे गेल्या वर्षी डीसी मुंबई इंडियन्सकडून अंतिम सामन्यात पराभूत झाले असून आयपीएल 2020 मधील चारही सामन्यांमध्ये त्यांना पराभूत करण्यात अपयशी ठरला होता. पंतच्या नेतृत्वात यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्सविरुद्ध दिल्ली पुनरागमन करण्याच्या निर्धारित असेल. चोपडा म्हणाले की, डीसीकडे त्यांच्या संघात अनेक मॅच-विनर आहेत जे सातत्याने योगदान देऊ शकतात. “त्यांची सर्वात मोठी शक्ती म्हणजे त्यांचा भारतीय कोर. त्यांच्याकडे शिखर धवन, रिषभ पंत, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल आणि त्यानंतर उमेश यादव व इशांत शर्मा आहेत. त्यांच्याकडे अमित मिश्रा देखील आहेत. हे एक विलक्षण भारतीय कोर आहे आणि त्यापैकी बरेच जण मॅच-विनर आणि सातत्यपूर्ण योगदान देणारे आहेत,” चोपडा म्हणाले.
कगिसो रबाडा, एनरिच नॉर्टजे, अश्विन, उमेश यादव, इशांत शर्मा यांच्यासारख्या दिल्लीच्या दर्जेदार गोलंदाजी आक्रमणाचेही चोपडा यांनी कौतुक केले. दिल्ली कॅपिटल्स वानखेडे स्टेडियमवर आयपीएल 2021 चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध आयपीएल हंगामाची सुरुवात करेल.