IPL 2021: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 13 वर्षाच्या इतिहासात असे फक्त एकदाच घडले आहे जेव्हा खेळाडूने बॅटने 300 धावा आणि हॅट्रिक घेतली आहे. तो खेळाडू दुसरा कोणी नसून भारताचा मर्यादित ओव्हर संघाचा उपकर्णधार आणि आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आहे. मुंबईच्या ‘हिटमॅन’ रोहितने 2009 मध्ये डेक्कन चार्जर्सकडून (Deccan Chargers) खेळताना अद्वितीय कामगिरी केली होती. विशेष म्हणजे रोहितने सध्याचा त्याचा आयपीएल (IPL) संघ मुंबई इंडियन्स विरोधातील सामन्यात हा कारनामा केला होता. टीम इंडियाचा ओपनर रोहित तेव्हा देखील सलामीला यायचा, पण एक वेळ अशी होती जेव्हा विरोधी फलंदाजांना त्याच्या गोलंदाजीचा देखील तर व्हायचा. संघाला गरज असताना तो चेंडूने महत्त्वपूर्ण विकेट घ्यायचा मात्र, त्याने आता गोलंदाजी करणे बंद केले आहे. (IPL: क्या बात है! 2008 पासून आतापर्यंत ‘हे’ 5 खेळत आहेत आयपीएल, यादीत भारतीयांचे राज्य तर ‘हा’ स्टार विदेशी खेळाडूचाही समावेश)
2009 मध्ये रोहितने बॅट सोबतच बॉलने देखील कमाल केली होती तर संपूर्ण मोसमात त्याने उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. रोहितने तेव्हा संपूर्ण मोसमात 365 धावा केल्या असून मुंबई इंडियन्सविरुद्ध हॅटट्रिक साजरी केली होती. आयपीएलच्या 32 व्यय सामन्यात मुंबई इंडियन्सच्या डावातील 15व्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर रोहितने अभिषेक नायर आणि अखेरच्या चेंडूवर हरभजन सिंहला बाद केले. त्यानंतर त्याने 17व्या ओव्हरमधील पहिल्या चेंडूवर जे.पी डुमिनीला तंबूत पाठवत हॅटट्रिक पूर्ण केली. दरम्यान, आयपीएलच्या 14 व्या हंगामात आता रोहितकडे अनोखा रेकॉर्ड करण्याची सुवर्ण संधी आहे. रोहितने मुंबईला पाच वेळा आणि सलग दोन वेळा आयपीएल विजेतेपद मिळून दिले आहे त्यामुळे त्याला विजेतेपदाची अनोखी हॅटट्रिक करण्याची संधी आहे.
दरम्यान, आयपीएल 2021 मध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली नाही. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरोधात झालेल्या स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात संघाला पराभव पत्करावा लागला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात त्यांनी संयमी कामगिरी करत विजय मिळवला होता. आता आपल्या तिसऱ्या सामन्यात मुंबई संघाची गाठ हैदराबादशी आहे. विशेष म्हणजे हा सामना चेपॉक स्टेडियमवर होणार आहे जिथे हैदराबाद संघाला आजवर एकही सामना जिंकता आलेला नाही.