IPL Trophy  (Photo Credit: Twitter)

Cricketers Who Played IPL Since Inception: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14व्या हंगामाला 9 एप्रिल रोजी सुरुवात झाली. यांच्या हंगामात सहा सामने झाले असून प्रत्त्येकाने चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. भारतात कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे आयपीएलची 2020 आवृत्ती युएईमध्ये आयोजित करण्यात आली होती. शिवाय, यंदा संपूर्णपणे स्पर्धेचे आयोजन भारतात होत असून चाहत्यांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी मिळाली नाही आणि स्पर्धा बायो-बबलमध्ये आयोजित केली जात आहे. टी-20 वर्ल्ड कपनंतर 2008 मध्ये पहिल्यांदा आयपीएलचे (IPL) आयोजन करण्यात आले असून लीगने कमी वेळेतच मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवली. क्रिकेट विश्वात प्रसिद्ध लीगमध्ये आजवर अनेक खेळाडू खेळले आहेत. काहींना खराब कामगिरीमुळे पुढे संधी मिळाली नाही तर काहींनी वय, दुखापत अशा अनेक कारणांमुळे माघार घेतली. पण असेही काही क्रिकेटर आहे जे सुरुवातीपासून अद्यापही या लीगमध्ये आपले योगदान देत आहेत. (IPL: आयपीएलमध्ये या 5 खेळाडूंनी कर्णधार म्हणून ठोकली आहे शतके, यादीत भारतीय खेळाडूंचा दबदबा)

1. रोहित शर्मा (Rohit Sharma)

सध्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार निःसंशयपणे लीगच्या सुपरस्टार्सपैकी एक आहे. रोहितच्या नेतृत्वात संघाने रेकॉर्ड पाच आयपीएल विजेतेपद जिंकले आहेत पण रोहितच्या कारकीर्दीची सुरूवात 2008 मध्ये डेक्कन चार्जर्सकडून केली. इतकंच नाही तर तो 2009 आयपीएल विजेतेपद जिंकणाऱ्या संघाचा सदस्य होता. त्यानंतर त्याला 2011 मध्ये मुंबई इंडियन्सने खरेदी केले आणि त्याला मागे वळून पाहण्याची गरजच पडली नाही.

2. एमएस धोनी (MS Dhoni)

भारताचा माजी कर्णधार देखील आयपीएलमधील एक अत्यंत प्रतिष्ठित क्रिकेटपटू आहे. 2008 पासून एमएस धोनी आयपीएलचा प्रमुख भाग राहिला आहे. चेन्नई सुपर किंग्सवर दोन वर्षाची बंदी घातल्यानंतर धोनी फक्त एकदाच दुसऱ्या फ्रँचायझीकडून झळकला आहे. 2016 मध्ये त्याने राइजिंग पुणे सुपरजायंटचे नेतृत्व केले पण पुढील वर्षी त्याची कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली. धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने तीन वेळा आयपीएल जिंकली आहे.

3. विराट कोहली (Virat Kohli)

भारतीय आणि आरसीबी कर्णधार आयपीएलच्या प्रत्येक आवृत्तीत एकाच फ्रँचायझीकडून खेळणारा एकमेव क्रिकेटपटू आहे. आरसीबीने त्याला अशा वेळी विकत घेतके जेव्हा तो नुकताच एक क्रिकेटपटू म्हणून आपला ठसा उमटवू लागला होता आणि आता आपल्या सातत्याने तो युवा खेळाडूंसाठी एक लीडर आणि आदर्श बनला आहे. कोहलीला 2013 मध्ये फ्रँचायझीचा कर्णधार म्हणून नेमण्यात आले होते.

4. क्रिस गेल (Chris Gayle)

स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट फलंदाज गेलने कोलकाता नाईट रायडर्समधून आयपीएलमध्ये पदार्पण केले. गेल 2010 पर्यंत केकेआरकडून खेळला नंतर डर्क नॅनेसची बदली म्हणून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सामील झाला आणि लीगमध्ये खेळलेल्या सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक बनला.

5. शिखर धवन

धवनने दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून आयपीएलची सुरुवात केली. त्यानंतर दोन हंगामासाठी मुंबई इंडियन्सकडून खेळल्यानंतर डेक्कन चार्जर्स आणि सनरायझर्स हैदराबादकडून खेळल्यानंतरटीम इंडियाचा ‘गब्बर’ 2019 मध्ये दिल्ली संघात परतला. धवन आयपीएलमधील सर्वात यशस्वी भारतीय फलंदाजांपैकी एक आहे. धवनने डॅरेन सॅमीच्या नेतृत्वात सनरायझर्स टीमकडून 2016 इंडियन प्रीमियर लीगचे विजेतेपद जिंकले.