IPL 2021: बुमबुम इज बॅक! मुंबई इंडियन्सच्या नेट्समध्ये Jasprit Bumrah ची धमाल, आयपीएलपूर्वी संघांना दिली चेतावणी (Watch Video)
जसप्रीत बुमराहची आयपीएल संघाला चेतावणी (Photo Credit: Instagram)

Jasprit Bumrah Bowling: गतविजेत्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) चेन्नईत इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या हॅटट्रिकवर लक्ष्य केंद्रित करत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरोधात मोसमाची सुरुवात करतील. यंदा आयपीएलच्या (IPL) पहिल्या सामन्यापासूनच मुंबई संघ मोसमात आघाडी घेऊ इच्छित असतील. यासाठी संघातील सर्व खेळाडू कसून तयारीला लागले आहेत. मुंबई आणि बेंगलोर यांच्यातील यंदाचा आयपीएल सलामीचा सामना चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर रंगणार आहे. मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा विजयाचे प्रबळ दावेदार असतील तर भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) खेळीवर पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष्य असेल. मुंबई इंडियन्सने बुमराहचा एक व्हिडिओ शेअर केला ज्यात वेगवान गोलंदाज पुन्हा एकदा विरोधी संघाला आपल्या गोलंदाजीने त्रास देण्यासाठी सज्ज असल्याचं दिसत आहे. बुमराह यापूर्वी इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात अखेर झळकला होता त्यानंतर त्याने वैयक्तिक कारणास्तव रजा मिळाली होती. (IPL 2021: एक नारळ दिलाय दर्या देवाला या गाण्यावर थिरकली रोहित शर्मा आणि पलटन, मुंबई इंडियन्सने शेअर केलेला मजेदार व्हिडिओ एकदा पहाच)

मुंबई इंडियन्सच्या व्हिडिओमध्ये बुमराह नेट्समध्ये गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉन्ड यांच्या नेतृत्वात यॉर्कर चेंडूचा सराव करताना दिसत आहे. बुमराहच्या भेदक गोलंदाजीचा हा व्हिडिओ आयपीएलपूर्वी विरोधी संघाला नक्कीच चेतावणी देणारा आहे. विशेष म्हणजे बुमराहने मागील वर्षी मुंबई संघासाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. 2020 मध्ये युएई येथे आयोजित करण्यात आलेल्या आयपीएलमध्ये बुमराह गोलंदाजांच्या पर्पल कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता. बुमराहने मुंबई इंडियन्ससाठी 15 सामन्यात 27 विकेट्स घेतल्या होत्या. बुमराह संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज असून अनेक वेळा त्याने संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)

दरम्यान, मुंबई इंडियन्सने यापूर्वी 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएल विजेतेपदाचा मान मिळवला होता. त्यामुळे, यंदाच्या आयपीएलमध्ये विजयी झाल्यास मुंबई विजेतेपदाची हॅटट्रिक करणारा पहिला संघ बनू शकतो.