IPL 2021: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या सुरुवातीला आता अवघा काही काळच शिल्लक आहे. सर्व संघ सध्या सराव, जाहिरात प्रमोशन, फोटोशूट यात व्यस्त आहेत. आयपीएलच्या (IPL) 14व्या हंगामाचा पहिला सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात रंगणार आहे. मुंबई इंडियन्स पाच आयपीएल विजेतेपदासह स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. या दरम्यान, मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडल, इंस्टाग्रामवर संघाच्या फोटोशूटचा एक भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जो चाहत्यांमध्ये तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मुंबई संघाचे प्रमुख खेळाडू एका प्रसिद्ध आगरी गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. ‘एक नारळ दिलाय दर्या देवाला’ या गाण्यावर मुंबई इंडियन्स कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), जसप्रीत बुमराह आणि पांड्या बंधू थिरकताना दिसत आहेत. (Mumbai Indians IPL 2021 Strength and Weakness: मुंबई इंडियन्सला रहावे लागणार सावध, या कमजोरीमुळे भंग होऊ शकते आयपीएल हॅटट्रिकचे स्वप्न)
मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कोणाची स्टेप तुम्हाला जास्त आवडली, असा सवाल संघाने कॅप्शनमध्ये विचारला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला रोहित आपल्या डान्सची झलक दाखवत आहे, ज्यानंतर इतर खेळाडू देखील आपला उत्कृष्ट सर्जनशील पाऊल पुढे टाकत काही मजेदार डान्स मूव्हीसह दाखवत आहेत. व्हिडिओमध्ये वैशिष्ट्यीकृत इतर सर्व खेळाडू एकटे नाचले, तर हार्दिक आणि क्रुणाल एकत्र आले व त्यांनी जोडीने चाहत्यांना प्रभावित केले.
View this post on Instagram
मागील वर्षी झालेल्या अंतिम लढतीत मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला होता आणि पाचव्या आयपीएल जेतेपद पटकावले होते. सलग दोन विजेतेपद जिंकलेली मुंबई संघाचे लक्ष विजेतेपदाच्या हॅटट्रिककडे असेल. आजवर एकही संघाला आयपीएल विजेतेपदाची हॅटट्रिक करता आलेली नाही.