IPL 2021: दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Delhi Capitals Vs Royal Challengers Bangalore) यांच्यात आज (27 एप्रिल) आयपीएल 2021 मधील 22वा सामना खेळला जाणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर हा सामना पार पडणार आहे. दिल्ली आणि बेंगलोर या दोन्ही संघासाठी आजचा सामना महत्वाचा आहे. बेंगलोरच्या संघाला चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गेल्या सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. ज्यामुळे आयपीएलच्या गुणतालिकेत बेंगलोरचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर, दिल्लीचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. तसेच आजच्या सामन्यात विजय मिळवणारा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेणार आहे.
बेंगलोरच्या संघासाठी वाईट बातमी अशी आहे की, ऑस्ट्रेलियाचे एडम झंपा आणि केन रिचर्डसन आयपीएलमधून माघार घेतली आहे. भारतात वाढणाऱ्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. तर, दिल्लीचा अनुभवी गोलंदाज आर अश्विन यानेही कोरोनामुळे आयपीएलमधून माघार घेतली आहे. हे देखील वाचा- DC vs RCB, IPL 2021: दिल्ली कॅपिटल्स आज रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरशी भिडणार, 'हे' खेळाडू मैदान गाजवण्याची शक्यता
बेंगलोर आणि दिल्लीच्या संघात आतापर्यंत 25 सामने खेळले गेले आहेत. ज्यात बेंगलोरच्या संघाने 14 सामने जिंकले आहेत. तर, दिल्लीच्या संघाला 10 सामन्यात विजय मिळवता आला आहे. याशिवाय, एक सामना रद्द झाला आहे. परंतु, यांच्यात पार पडलेल्या गेल्या पाच सामन्यात दिल्लीने 4 सामन्यात बेंगलोरला पराभूत केले आहे. तर, एका सामन्यात बेंगलोरचा विजय झाला आहे.
संघ-
दिल्लीची कॅपिटल्स: ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), शिखर धवन, पृथ्वी शॉ, स्टीव्ह स्मिथ, शिमरॉन हेटमीयर, कॅगिसो रबाडा, ललित यादव, मार्कस स्टोनिस, अक्षर पटेल, अमित मिश्रा, अवेश खान.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडीकल, एबी डिव्हिलियर्स (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, डॅनियल सेम्स, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, हर्षल पटेल, ग्लेन मॅक्सवेल, काईल जेमीसन.