DC vs RCB, IPL 2021: दिल्ली कॅपिटल्स आज रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरशी भिडणार, 'हे' खेळाडू मैदान गाजवण्याची शक्यता
रिषभ पंत (Photo Credit: PTI)

आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील 22व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आज रॉयस चॅलेंजर्स बेंगलोरशी (Delhi Capitals Vs Royal Challengers Bangalore) भिडणार आहे. अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी मैदानावर (Narendra Modi Stadium) हा सामना खेळला जाणार आहे. या हंगामात दोन्ही संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी कामगिरी करून दाखवली आहे. आयपीलच्या गुणतालिकेत दिल्लीचा दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, बेंगलोरचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. एकीकडे दिल्लीच्या संघाने सनरायझर्स हैदराबादला सुपर ओव्हरमध्ये पराभूत केले आहे. तर, दुसरीकडे बेंगलोरचा संघाला चेन्नई सुपर किंग्जकडून 68 धावांनी पराभव पत्कारावा लागला आहे. यामुळे आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चेन्नईकडून मिळालेल्या पराभवाच्या आधी बेंगलोरच्या संघाने सलग चार सामन्यात विजय मिळवला होता. बेंगलोरकडे ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स सारखे जबरदस्त खेळाडू आहेत. तर, सलामीवीर देवदत्त पेडिक्कल आणि कर्णधार विराट कोहलीदेखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे. दुसरीकडे, कोरोनावर मात केल्यानंतर दिल्लीचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल संघात सामील झाला आहे. त्याने हैदराबाद विरुद्ध झालेल्या सुपर ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. हे देखील वाचा- IPL 2021: आयपीएल मधून खेळाडूंची कोरोनामुळे माघार, रविचंद्रन अश्विन नंतर 'हे' क्रिकेटपटू सामन्यांमधून पडले बाहेर

महत्वाचे म्हणजे, हैदराबाद विरुद्ध विजय मिळवल्यानंतर दिल्लीचा अनुभवी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने आयपीएलमधून माघार घेतली आहे. अश्विनच्या गैरहजरीत अमित मिश्रा आणि अक्षर पटेल यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. हैदराबाद विरुद्ध सामन्यात चांगली कामगिरी केली होती. या दोघांनी आठ षटकात 57 धावा देऊन 3 विकेट्स पटकावले होते.

संघ-

दिल्ली कॅपिटल्स: ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, स्टीव्ह स्मिथ, सॅम बिलिंग्ज, शिमरॉन हेटमीयर, इशांत शर्मा, कॅगिसो रबाडा, एरिक नॉर्टजे, उमेश यादव, टॉम करन, अवेश खान, ललित यादव, प्रवीण दुबे, रिपल पटेल, लुकमान मेरीवाला, एम सिद्धार्थ, मार्कस स्टॉयनिस, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, ख्रिस वॉक्स, विष्णू विनोद, आदित्य तारे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पद्धिकल, फिन ऐलन, एबी डिव्हिलियर्स (यष्टीरक्षक), पवन देशपांडे, वॉशिंग्टन सुंदर, डॅनियल लेम्स, युजवेंद्र चहल, अॅडम जंपा, शाहबाज अहमद, मोहम्मद सिराज , नवदीप सैनी, केन रिचर्डसन, हर्षल पटेल, ग्लेन मॅक्सवेल, सचिन बेबी, रजत पाटीदार, मोहम्मद अझरुद्दीन, काईल जेमीसन, डॅनियल ख्रिश्चन, सुयेश प्रभुदेसाई, केएस इंडिया.