आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2021 Auction Oldest Player: बीसीसीआयने (BCCI) आयपीएल (IPL) 2021 लिलावासाठी नोंदणी करण्यासाठी 292 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. अर्जुन तेंडुलकर, एस श्रीसंत आणि इतर काही जणांची नावे चर्चेत आली होती, पण नयन दोषी (Nayan Doshi) फारशी प्रसिद्धी मिळवू शकले नाहीत. भारताचा माजी फिरकीपटू दिलीप दोशी (Dilip Doshi) यांचा मुलगा नयनने इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या लिलावात नाव नोंदविणारा सर्वात वयस्कर खेळाडू म्हणून विक्रम रचला आहे. नॉटिंगहॅममध्ये (Nottingham) जन्मलेले नयन आता 42 वर्षाचे आहेत आणि आयपीएल करार मिळवण्याच्या शर्यतीत काही युवा खेळाडूंसह स्पर्धा करणार आहेत. दरम्यान, प्रवीण तांबे आता आयपीएल खेळण्यास पात्र नसल्याने नयन 14व्या आवृत्तीतील सर्वात वयस्कर खेळाडूही बनेल. यावर्षी लिलाव 18 फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे होईल. लिलावासाठी खासगीरित्या हजारहून अधिक खेळाडूंनी नोंदणी केली होती. यामध्ये भारतातील 814 खेळाडू आणि 283 परदेशी खेळाडूंनी नोंदणी केली होती. (IPL 2021 Auction List: Sreesanth याचे आयपीएल खेळण्याचे स्वप्न भंग, लिलावासाठी फायनल 292 खेळाडूंची यादी जाहीर)

नयन यांच्या आजवरच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे तर 70 प्रथम श्रेणी आणि 74 लिस्ट ए सामन्यांमध्ये दोशीने अनुक्रमे 166 आणि 64 विकेट घेतल्या आहेत. त्यांनी 52 टी-20 सामने देखील खेळले आहेत ज्यात त्यांनी 68 गडी बाद केले आहेत. नॉटिंघॅममध्ये जन्मलेल्या दोशीने 2001/02 मध्ये सौराष्ट्रसाठी प्रथम श्रेणीमध्ये प्रवेश केला होता. ते सरेकडून काऊंटी क्रिकेट खेळले पण नंतर सौराष्ट्राबरोबर दुसर्‍या कारकिर्दीसाठी ते भारतात परतले. ते यापूर्वी आयपीएलच्या मागील हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्सचा सदस्य होते. 2011 पासून ते आयपीएल खेळले नाही आणि यंदा बोली लागवल्यास ते दशकानंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करतील. मात्र, नयन यांच्यासाठी वाट बिकट असेल. 2013/14 पासून त्यांनी एकही स्पर्धात्मक सामना खेळलेला नाही.

आयपीएल लिलावात यंदा एकूण 292 खेळाडूंवर बोली लगावली जाईल. स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात 7 वर्षाच्या बंदीनंतर कमबॅक करणाऱ्या एस श्रीसंतला वगळण्यात आले आहेत तर सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन, भारताचा कसोटी तज्ज्ञ चेतेश्वर पुजारा आणि ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज मार्नस लाबूशेनला लिलावात सामील करण्यात आले आहेत.