IPL 2021 Auction List: Sreesanth याचे आयपीएल खेळण्याचे स्वप्न भंग, लिलावासाठी फायनल 292 खेळाडूंची यादी जाहीर

इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सत्रात खेळाडूंचा लिलाव होणार आहे. 7 वर्षांच्या दीर्घ अंतरानंतर क्रिकेटच्या पीचवर परतलेल्या एस. श्रीसंतची निवड झाली नाही. स्पॉट फिक्सिंगमध्ये सात वर्षाची शिक्षा भोगलेल्या श्रीसंतने नुकतंच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी माध्यमातून क्रिकेटच्या मैदानावर परतला. श्रीसंतला मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये केरळ संघात स्थान मिळालं

IPL 2021 Auction List: Sreesanth याचे आयपीएल खेळण्याचे स्वप्न भंग, लिलावासाठी फायनल 292 खेळाडूंची यादी जाहीर
IPL Trophy  (Photo Credit: Twitter)

IPL 2021 Auction List: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14 व्या सत्रात 18 फेब्रुवारी रोजी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. यावर्षी लिलावासाठी 1,114 खेळाडूंनी नोंदणी केली होती मात्र, बीसीसीआयने जाहीर केलेल्या यादीमध्ये फक्त 292 खेळाडू लिलावासाठी निवडले गेले आहेत. 7 वर्षांच्या दीर्घ अंतरानंतर क्रिकेटच्या पीचवर परतलेल्या एस. श्रीसंतची निवड झाली नाही. आयपीएलच्या (IPL) 14व्या हंगामाच्या लिलावासाठी एकूण खेळाडूंची यादी सर्व 8 फ्रँचायझींना पाठवली गेली आहे. स्पॉट फिक्सिंगमध्ये सात वर्षाची शिक्षा भोगलेल्या श्रीसंतने (Sreesanth) नुकतंच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी माध्यमातून क्रिकेटच्या मैदानावर परतला. श्रीसंतला मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये केरळ संघात स्थान मिळालं आणि त्यानंतर त्याने यंदा आयपीएल लिलावासाठी नोंदणी केली होती. (IPL 2021 Auction: Arjun Tendulkar याच्यासाठी ‘या’ 3 कारणांमुळे आयपीएल 14च्या लिलावात फ्रँचायझीमध्ये रंगू शकते चुरशीची लढाई)

भारताचा कसोटी तज्ज्ञ चेतेश्वर पुजारा आयपीएल 2021 लिलावासाठी शॉर्टलिस्ट खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाला आहे. सौराष्ट्रचा फलंदाज 50 लाखांच्या बेस प्राइसवर उपलब्ध असेल. अखेर 2014 मध्ये आयपीएल खेळलेला पुजारा किंग्ज इलेव्हन पंजाब, कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे प्रतिनिधित्व खेळे आहेत. सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुनला लिलावासाठी तयार करण्यात आलेल्या फायनल खेळाडूंच्या यादीत स्थान मिळाले असून त्याची बेस प्राईज 20 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ग्लेन मॅक्सवेल आणि स्टिव्ह स्मिथ व्यतिरिक्त परदेशी खेळाडूंमध्ये शाकिब अल हसन, मोईन अली, सॅम बिलिंग्ज, लियम प्लंकेट, जेसन रॉय आणि मार्क वुड यांचा सर्वाधिक बेस प्राइसमध्ये समावेश झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज मार्नस लाबूशेनने पहिल्यांदा आयपीएलसाठी नोंदणी केली असून त्याची बेस प्राईस दीड कोटी रुपये आहे.

दरम्यान, आयपीएल 2021 च्या लिलावात दोन कोटींच्या बेस प्राइस असलेल्या खेळाडूंच्या रांगेत एकूण 10 नावे आहेत. यामध्ये हरभजन सिंह आणि केदार जाधव असे दोन भारतीय असतील तर मॅक्सवेल, स्मिथ, शाकिब अल हसन, मोईन अली, सॅम बिलिंग्ज, लियम प्लंकेट, जेसन रॉय आणि मार्क वुड असे 8 परदेशी खेळाडू आहेत. दीड कोटी रुपये किंमत असलेल्या 12 खेळाडू लिलावाच्या यादीत आहेत. 1 कोटीच्या बेस प्राइस 11 खेळाडूंच्या यादीत हनुमा विहारी आणि उमेश यादव हे दोन भारतीय खेळाडू आहेत. चेन्नईतील आयपीएल 2021 प्लेयर ऑक्शनमध्ये एकूण 164 भारतीय, 125 परदेशी आणि असोसिएट देशाचे 3 खेळाडू आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Feb 12, 2021 10:33 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).