IPL 2021 Auction: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14व्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव येत्या 18 फेब्रुवारी रोजी आयोजित केला जाणार आहे. भारत आणि इंग्लंड संघातील दुसऱ्या टेस्ट सामन्यानंतर लिलाव आयोजित केला जाणार आहे. यंदा, 1,000 हून अधिक खेळाडूंनी आगामी आयपीएल (IPL) लिलावासाठी नोंदणी केली असून मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) सर्वांचे लक्ष वेधून घ्यावे. अर्जुनबाबत फक्त आडनावाबद्दलच नाही, तर वेगवान गोलंदाज म्हणून काम करण्याची क्षमता याबद्दलही चर्चा रंगली आहे. आता त्याच्यासाठी कोणती फ्रँचायझी बोली लागवते हे पाहणे उत्साहाचे ठरणार आहे. 21 वर्षीय अर्जुनने पहिल्यांदा लिलावाच्या रिंगणात उतरला असून त्याने आपली बेस प्राईज 20 लाख ठेवली आहे. विशेष म्हणजे अर्जुन मुंबईच्या जुनिअर सर्किटमधील नियमित खेळाडू आहे आणि त्याने अलीकडेच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधून वरिष्ठ संघात पदार्पण केले. 20 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीसाठी अर्जुन देखील शॉर्टलिस्टेड खेळाडूंपैकी आहे. (IPL 2021 Auction: अर्जुन तेंडुलकरसाठी आयपीएल लिलावात या 3 फ्रँचायझींमध्ये रंगू शकते चुरस, मुंबईकर गोलंदाजाला मिळू शकतो चांगला भाव)
आज या लेखात आपण पाहणार आहोत अशी 3 करणं ज्यामुळे जुनिअर तेंडुलकर आगामी लिलावात चुरशीच्या लढाईसाठी कारणीभूत ठरू शकतो.
1. आपला फॉर्म कायम ठेवल्यास तो लवकरच मोठ्या टप्पा गाठू शकतो हे अर्जुनने बर्याच वेळा दाखवून दिले आहे. उल्लेखनीय म्हणजे, त्याने पायडे ट्रॉफी दरम्यान मुंबईच्या अंडर-16 सामन्यात 106 धावा केल्या. तसेच,2017 मध्ये लॉर्ड्स येथे इंग्लंड संघाला नेटमध्ये गोलंदाजी करताना अर्जुनने जबरदस्त यॉर्करने जॉनी बेअरस्टोचे नेट सत्र खराब केले होते. शिवाय, अर्जुन डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज असून त्याच्याकडे अस्वस्थ अँगलने चेंडू फेकण्याची क्षमता आहे.
2. आयपीएलमध्ये अर्जुनची उपस्थितीदेखील माध्यमांचे लक्ष वेधून घेईल, जे फ्रँचायझी चांगल्या प्रकारे जाणतात. त्यामुळे, आयपीएल 2021 लिलावात युवा खेळाडूला संघात समावेश करणाऱ्या संघाच्या व्यावसायिक आणि ब्रँड मूल्यात वाढ होण्याची शक्यता आहे. शिवाय, सचिन तेंडुलकरचा मुलगा असल्याने अर्जुन चाहत्यांच्या संख्येवर प्रभाव टाकू शकतो.
3. सचिन तेंडुलकर मार्गदर्शन असलेली मुंबई इंडियन्स जुनिअर तेंडुलकरला आपल्या संघात ठेवण्यासाठी प्रयत्नशील असेल आणि ते बोलीत सामील होऊ शकतात. तसेच, नेट गोलंदाज म्हणून अर्जुन मुंबईच्या संघात गेली अनेक वर्षे होता आणि आयपीएल 2020 साठी तो संघासह युएईलाही पोहचला होता आणि आवश्यक असलेला अनुभव मिळविला ज्यामुळे गतविजेता चॅम्पियन्स संघ त्याच्यासाठी बोली लागवण्याची शक्यता वाढली आहे.