IPL 2020: केएल राहुलचा KXIP आयपीएल बाहेर पडल्याने आता 'या' खेळाडूंना 'ऑरेंज कॅप' पटकावण्याची संधी, अव्वल स्थानाच्या लढतीत कोण मारणार बाजी?
किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुल (Photo Credit: PTI)

IPL 2020 Orange Cap: मंगळवारी शारजाह येथे डेविड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाने टेबल-टॉपर मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) 10 गडी राखून पराभव करून प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. यासह, इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 13व्या सत्रात कोलकाता नाइट रायडर्सचा (केकेआर) प्रवास संपुष्टात आला.  अखेरचा साखळी सामना संपल्यानंतर मुंबई इंडियन्स 18 गुणांसह अव्वल स्थानी आहे तर दिल्ली कॅपिटल (डीसी) 16 गुणांसह दुसर्‍या स्थानावर आहेत. आयपीएलच्या (IPL) लीग स्टेज संपुष्टात आल्याने आता पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅपच्या यादीत देखील मोठे बदल पाहायला मिळणार आहे. किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) 14 सामन्यात 670 धावा करून अव्वल स्थान पटकावले आहे, पण आता राहुलचा संघ आयपीएलमधून बाहेर पडला असल्याने टॉप-5 मधील फलंदाजांकडे ऑरेंज कॅप पटकावण्याची संधी आहे. (IPL 2020 PlayOffs Match: आयपीएल 2020 प्ले-ऑफमध्ये कोणाता संघ कोणाशी भिडणार? येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक)

राहुल पाठोपाठ सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने (David Warner) 529, दिल्ली कॅपिटल्सचा शिखर धवनने (Shikhar Dhawan) 525, आरसीबीच्या देवदत्त पडिक्क्ल 472 आणि आरसीबी कर्णधार विराट कोहलीने 460 धावा करून अनुक्रमे दुसरे ते पाचवे स्थान मिळवले आहे. राहुल आता ऑरेंज कॅपच्या शर्यतीतून बाहेर पडल्याने वॉर्नर आणि धवन यांच्याकडे मोठी संधी आहे. वॉर्नरला 141 धावा, तर धवनला अव्वल स्थान गाठण्यासाठी 145 धावांची गरज आहे. दोन्ही फलंदाज सध्या फॉर्ममध्ये आहेत. वॉर्नरचा हैदराबाद संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर असल्याने त्याला दोन सामानाने खेळण्याची संधी आहे, शिवाय, दिल्ली कॅपिटल्सचा पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभव झाल्यास धवनकडेही दुसरा सामना खेळत राहुलच्या एकूण धाव संख्येजवळ जाण्याची संधी आहे.

दुसरीकडे, देवदत्त पडिक्क्लला 198 आणि विराटला पहिले स्थान गाठण्यासाठी 210 धावांची गरज आहे. दोन्ही फलंदाजांची हे अशक्य दिसत असताना आयपीएल हा अनिश्चिततेचा खेळ असल्याचे लक्षात ठेवले पाहिजे, इथे कधीही काहीही होऊ शकते. याशिवाय आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ऑरेंज कॅप मिळवण्याचा मान सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने मिळवला आहे. वॉर्नरने आजवर तीन वेळ ऑरेंज कॅप जिंकली असून यंदा तो चौकार मारतो की नाही हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.