आयपीएल (IPL) 13 मध्ये रविवारी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) यांच्यात झालेल्या सामन्यात अंपायरच्या निर्णायावरून वाद निर्माण झाला आहे. या विवादावर किंग्स इलेव्हन पंजाबची मालकीण प्रीती झिंटाने (Preity Zinta) संताप व्यक्त केला. पंजाबच्या डावाच्या 19 व्या षटकात मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि क्रिस जॉर्डन (Chris Jordan) 158 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना फलंदाजी करीत होते. त्याच षटकात जॉर्डनला शॉर्ट-रन दिली परंतु रीपलेमध्ये जॉर्डनची बॅट क्रीजच्या आत असलेल्या दिसले. चुरशीच्या ठरलेल्या या सामन्यातील सदोष अम्पायरिंगसंदर्भात दिग्गजांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. पंजाब संघाचा मार्गदर्शक असणाऱ्या वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) पाठोपाठ किंग्स इलेव्हनची मालकीण आणि अभिनेत्री प्रिती झिंटाने अंपायरच्या चुकीचा त्रास झाल्याचे म्हटलं. या सामन्यामध्ये दिल्लीच्या विजयात मोठा हातभार लावणाऱ्या मार्कस स्टोइनिसला समानावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला, पण सेहवाग म्हणाला की अंपायरला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार द्यायला हवा. (DC vs KXIP, IPL 2020: सुपर थरार! रोमहर्षक सुपर ओव्हरमध्ये सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विजयी, मयांक अग्रवालची अर्धशतकी खेळी व्यर्थ)
“मला आजच्या समन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटलेला नाही. ज्या पंचांनी ही धाव शॉर्ट रन घोषित केली त्यांना मॅन ऑफ द मॅच पुरस्कार द्यायला हवा. हा शॉर्ट रन नव्हता. आणि याच एका धावेचा फरक नंतर पडला,” असं ट्विट सेहवागने केलं. या नंतर प्रितीने सेहवागचे ट्विट रिट्विट करून म्हटले की, “(करोनाची) साथ सुरु असतानाही मी प्रवास करुन इथपर्यंत आले. सहा दिवस क्वारंटाइन राहिले. करोनाच्या पाच टेस्ट अगदी हसत हसत सामोरे गेले. मात्र या एका शॉर्ट रनच्या निर्णयामुळे मी दुखावले गेले. तंत्रज्ञान वापरता येत नसेल तर ते काय कामाचे आहे? हा योग्य वेळ आहे याबद्दल निर्णय घेण्याचा. बीसीसीआयने नवीन नियम लागू करावेत. दरवर्षी हे असं होता कामा नये.”
सेहवागचे ट्विट:
I don’t agree with the man of the match choice . The umpire who gave this short run should have been man of the match.
Short Run nahin tha. And that was the difference. #DCvKXIP pic.twitter.com/7u7KKJXCLb
— Virender Sehwag (@virendersehwag) September 20, 2020
प्रीतीचे ट्विट
I travelled enthusiastically during a pandemic,did 6 days of Quarantine & 5covid tests with a smile but that one Short Run hit me hard. What’s the point of technology if it cannot be used? It’s time @BCCI introduces new rules.This cannot happen every year. #DCvKXIP @lionsdenkxip https://t.co/uNMXFJYfpe
— Preity G Zinta (@realpreityzinta) September 21, 2020
पाहा जॉर्डनची 'ती' धाव
Use the technology available. Poor #DCvKXIP pic.twitter.com/BZbRaA571d
— Trent Woodhill (@TrentWoodhill) September 20, 2020
रविवार, 20 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दिल्लीच्या कॅपिटल्सने किंग्स इलेव्हन पंजाबला सुपर ओव्हरमध्ये पराभूत केले. अखेरच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या सामन्यात दोन्ही टीम खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली. दिल्लीने दिलेल्या 158 धावांच्या प्रत्युत्तरात किंग्स इलेव्हनने मयंक अग्रवालच्या 89 धावांच्या जोरावर सामना बरोबरीत रोखला. सामन्यात विजयी टीमचा निर्णय अखेर सुपर-ओव्हरमध्ये घेण्यात आला. किंग्स इलेव्हनने पहिले सुपर-ओव्हर खेळली आणि दिल्लीला 3 फक्त धावांचे लक्ष्य दिले. दिल्लीने सहज ते लक्ष्य पूर्ण केले आणि 2 गुण मिळवले.