इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) 2020 साठी खेळाडूंचा लिलाव गुरुवारी, 19 डिसेंबरला संपुष्टात आला. यंदाच्या आयपीएलच्या (IPL) लिलावात 338 खेळाडूंचा लिलावात समावेश करण्यात आला. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स (Pat Cummins) याला सर्वाधिक 15 कोटी 50 लाखांची बोली मिळाली. यंदाच्या लिलावात विदेशी खेळाडू मालामाल झाले. कमिन्सनंतर अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल, क्रिस मॉरिस, शेल्डन कोटरेल यांसारख्या खेळाडूंना सर्वाधिक रुपयांत खरेदी केले गेले. यावेळी, लिलावात अनकेप्ड खेळाडूंना तीन वेगवेगळ्या बेस प्राईसमध्ये ठेवण्यात आले होते. युवा खेळाडूंनाही चांगला बाव मिळाला. प्रियम गर्ग, यशस्वी जयस्वाल, विराट सिंह यांना फ्रँचायझींनी मोठी रक्कम देऊन खरेदी केले. पण, यासर्वांमधे भारताचे सध्याचे चार खेळाडू आहेत, ज्यांचा पगार यावेळी सर्वाधिक आहे. टॉप 5 बद्दल बोलले तर यात युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याचादेखील समावेश आहे. (IPL 2020: आरोन फिंच याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने केले खरेदी केल्यावर Cricket Australia ने टिम पेन सोबतचा व्हिडिओ शेअर करत केले ट्रोल, पाहा Video)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), चार वेळा मुंबई इंडियन्सचा विजयी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), चेन्नई सुपर किंग्जला तीन वेळा चॅम्पियन बनविणारा कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) आणि दिल्लीच्या कॅपिटल्ससाठी दमदार बॅटिंग करणाऱ्या पंतला आयपीएल (IPL) 2020 मध्ये सर्वाधिक रक्कम मिळवणार आहेत. विराट या हंगामात या तीन खेळाडूंपेक्षा 2 कोटी रुपये अधिक घेऊन खेळणार आहे. लिलावाआधी, आरसीबीने विराटला 17 कोटी रुपयांत रिटेन केले होते, तर मुंबई इंडियन्सने रोहितला 15, चेन्नई सुपर किंग्सने धोनीला 15 आणि पंतला दिल्ली कॅपिटल्सने 15 कोटी रुपयांच्या मोठ्या रकमेसह संघात कायम ठेवले आहे. महत्वाचे म्हणजे विराट, रोहित आणि धोनीला 2018 पासून यात किमतीत रिटेन केले जात आहे. पाचव्या क्रमांकावर स्टिव्ह स्मिथ, डेविड वॉर्नर, बेन स्टोक्स आणि सुनील नारायण यांनी बरोबरी साधली आहे. या सर्वांना त्यांच्या संघ मालकांनी 12 कोटी 50 लाखात रितें केले आहेत. यांच्यानंतर हार्दिक पंड्या, केएल राहुल आणि सुरेश रैना 11 कोटींसह सहाव्या स्थानावर आहे.
दरम्यान, पॅट कमिन्स हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला. केकेआरने त्याला सर्वाधिक 15.5 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. यावेळी एकूण 62 खेळाडूंसाठी बोली लावण्यात आली. त्यामध्ये 29 परदेशी आहेत.