IPL 2020: आरोन फिंच याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने केले खरेदी केल्यावर Cricket Australia ने टिम पेन सोबतचा व्हिडिओ शेअर करत केले ट्रोल, पाहा Video
आरोन फिंच (Photo Credit: Getty Images)

इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) च्या आगामी हंगामासाठी ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकारांचा कर्णधार आरोन फिंच (Aaron Finch) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) कडून खेळताना दिसणार. गुरुवारी कोलकातामध्ये झालेल्या लिलावात फिंचला विराट कोहली (Virat Kohli) याच्या नेतृत्वातील आरसीबीने त्याला 4.4 कोटीच्या रकमेत संघात सामिल केले. आयपीएल (IPL) मधील फिंचचीही आठवी टीम असणार आहे. आठ फ्रेंचायझीसाठी खेळणारा तो एकमेव खेळाडू आहे. आरसीबीने (RCB) फिंचला या लिलावात खरेदी केल्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक जुना व्हिडिओ शेअर केला आणि फिंचला ट्रोल केले. या व्हिडिओमध्ये ऑस्ट्रेलियाचा टेस्ट कर्णधार टिम पेन आणि फिंचमधील भारतीय संघाच्या दौऱ्यातील एका टेस्ट मॅचमध्ये मजेदार संभाषण करताना दिसत आहे. हा व्हिडिओ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शेअर करत फिंचला ट्रोल केले आणि सध्या तो व्हायरल होत आहे. (IPL 2020 Auction: जयदेव उनाडकट याने आयपीएल लिलावात नोंदवला नवीन रेकॉर्ड, राजस्थान रॉयल्स ने 3 कोटींमध्ये केले खरेदी)

डिसेंबर 2018 मध्ये भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर पर्थमधील तिसऱ्या टेस्ट सामन्यादरम्यान दोन ऑस्ट्रेलियन खेळाडूंमधील संवाद झाला. यावेळी पेनने फिंचला विचारले, "तू आयपीएलमधील जवळपास सर्व संघांकडून खेळला आहे." यावर फिंच म्हणाला, "आरसीबी वगळता." फिंचच्या प्रतिसादावर पेनने नंतर विचारले, "त्यांनी तुला का घेतले नाही, विराट तुला पसंत नाही करत का?" त्यानंतर फिंच म्हणाला, "मला कोणीही पसंत करत नाही, म्हणून माझा संघ बदलत राहतो." पेन आणि फिंचमधील हे संभाषण क्रीजवरील रोहित शर्मा ला विचलित करण्यासाठी केले होते. पाहा पेन आणि फिंचमधील संभाषणाचा हा व्हिडिओ:

यावर आरसीबीने प्रतिसाद देत क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे ट्विट रीट्विट केले आणि लिहिले, "मला वाटते, फिंच, कोहली तुम्हाला किती पसंत करतो हे आम्ही नुकतेच सिद्ध केले."

दरम्यान, यापूर्वी फिंच राजस्थान रॉयल्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स (कॅपिटल्स), गुजरात लायन्स, मुंबई इंडियन्स, पुणे वॉरियर्स, सनरायझर्स हैदराबाद आणि किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळला आहे. यात त्याने 75 सामन्यात 26.31 च्या सरासरीने 1737 धावा केल्या आहेत. त्याने 2013 मध्ये एक विकेटदेखील घेतली होती. फिंचने 2010 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. 2019 मध्ये झालेल्या वनडे विश्वचषकाच्या तयारीमुळे तो स्पर्धेत सहभागी झाला नव्हता. पण, आता 2020 मध्ये तो कोहलीच्या नेतृत्वात बंगळुरुकडून खेळताना दिसेल.