जसप्रीत बुमराह पहिली आणि 100वी आयपीएल विकेट (Photo Credit: Twitter/mipaltan)

MI vs RCB, IPL 2020: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) आयपीएल (IPL) 13 च्या 48व्या सामन्यात काही खास कामगिरी करू शकला नाही आणि केवळ 9 धावा करून बाद झाला. अबू धाबीच्या शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर सुरु असलेल्या आयपीएल सामन्यात विराट त्याचा जसप्रीत बुमराहचा (Jasprit Bumrah) शिकार बनला. दरम्यान, लक्षात घेण्यासारखे म्हणजे आरसीबी (RCB) कर्णधार विराट त्याचा पहिला आणि 100 वी विकेट ठरला. डावाच्या 12 व्या ओव्हरमधील दुसऱ्या चेंडूवर बुमराहने विराटला सौरभ तिवारीकडे झेलवर झेलबाद केले. त्याने 14 चौकारांच्या खेळीत कोणतीही चौकार न मारता 9 धावा केल्या. याशिवाय आरसीबीविरुद्ध सामन्यात बुमराहने कोहलीला बाद करताच आयपीएल कारकीर्दीतही 100 विकेटचा टप्पा गाठला. आयपीएलमध्ये 100 विकेटचा टप्पा ओलांडणार बुमराह 15वा गोलंदाज ठरला. (MI vs RCB, IPL 2020: देवदत्त पडिक्कलच्या धडाकेबाज अर्धशतकाने आरसीबीची 164 धावांपर्यंत मजल, MI समोर 165 धावांचं आव्हान)

बुमराह हा भारताचा एकमेव वेगवान गोलंदाज आहे जो आयपीएलमध्ये 100 आणि टी-20 क्रिकेटमध्ये 200 बळी घेण्यास यशस्वी झाला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये 200 विकेट घेणारा बुमराह हा सहावा तर सर्वात वेगवान गोलंदाज ठरला आहे. बुमराहपूर्वी टी-20 क्रिकेटमध्ये पीयूष चावला, अमित मिश्रा. अश्विन, हरभजन सिंह आणि चहल यांनी 200 विकेटचा टप्पा ओलांडला आहे. चावला टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स भारतीय गोलंदाज आहे. चावलाने टी -20 क्रिकेटमध्ये 257 गडी बाद केले आहेत. अमित मिश्राने 256 टी-20 बळी टिपले आहेत तर अश्विनने आजवर 244, हरभजन सिंहने 235 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय, युजवेंद्र चहलने आतापर्यंत 205 टी-20 विकेटची नोंद केली आहे.

दरम्यान, आयपीएल 2020 च्या आजच्या 48व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीने पहिले फलंदाजी करताना 6 विकेट्सवर 164 धावा केल्या. मुंबईकडून बमराहने 4 ओव्हरमध्ये 14 धावा देऊन 3 गडी बाद केले. यासह 26 वर्षीय बुमराह आयपीएल 2020 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज बनला. सध्याच्या मोसमात मोहम्मद शमीनेही देखील बुमराहप्रमाणे 20 विकेट घेतल्या आहेत. बुमराह व्यतिरिक्त ट्रेंट बोल्ट, राहुल चाहर आणि कर्णधार किरोन पोलार्ड यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.